अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रोटरी क्लब ऑफ कात्रज पुणे यांच्यातर्फे भव्य पेंटींग प्रदर्शन
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज हा डिस्ट्रिक्ट 3131 मधील एक नावाजलेला क्लब आहे. गेल्या तीस वर्षात या क्लबने सामाजिक बांधिलकी जाणून, अनेक लोकोपयोगी प्रकल्प हाती घेऊन तडीस नेले आहेत.
या वर्षी आपण कोंढवा येथील बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक ला डायबेटीक फूट व Artificial Limb या साठी मदत करण्याचे ठरविले आहे. त्या साठी निधी ची आवश्यकता आहे.
आपले मानद सदस्य आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वॉटर कलर आर्टिस्ट श्री.मिलिंद मुळीक यांच्या paintings चे प्रदर्शन 14 व 15 September रोजी बालगंधर्व, कलादालन येथे भरवणार आहोत.
आमच्या क्लबचे आर्टिस्ट श्री दिलीप पंडित (Wild Life Photography) व सौ अंजली हुगे (Oil Painting) यांच्या कलाकृती पण या Exhibition मध्ये विक्री साठी ठेवल्या जातील.
चित्रकलेला लोकाश्रय मिळावा, रसिक जना मधे चित्र खरेदीचा उत्साह(awareness) निर्माण व्हावा हा सुद्धा उद्देश या प्रदर्शनात मागे आहे. Charitable cause साठी म्हणून चित्रे, प्रत्यक्ष दरापेक्षा माफक दरात विक्री साठी ठेवण्यात येणार आहेत.
तरी जास्तीत जास्त संख्येने आपण या प्रदर्शनाला यावे आणि ही दुर्मिळ चित्रे खरेदी करावीत ही विनंती.
आपण सर्व जण या noble cause साठी भरभरून मदत कराल हा विश्वास वाटतो.
