अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जनसुरक्षा कायदा विधेयकाच्या विरोधात तहसीलदार यांना शिवसेना उद्धजी ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
जनसुरक्षा कायदा विधेयकाच्या विरोधात तहसीलदार यांना निवेदन उदगीर दि. शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तहसीलदार यांना जनसुरक्षा कायदा विधेयकाच्या विरोधात निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर या विधेयकाच्या उद्देशांमध्ये राज्यातील दुर्गम व शहरी भागात नक्षलवादाचा प्रभाव वाढत असून शहरात त्यांची सुरक्षित आश्रय स्थळे व शहरी अड्डे वाढत असल्यामुळे त्यांच्या बेकायदेशीर कृत्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर कायद्याची गरज असल्याचे नोंदवण्यात आले आहे. या कायद्यातील तरतुदी तपासल्या असता लक्षात येते की हा कायदा सरकारी दडपशाहीला वाव देणारा असंविधानीक आणि शासन व पोलीसी मनमानीला वाव देणार आहे. तसेच नागरिक व नागरी संघटनाचे लोकशाही अधिकार नाकारणारा आहे. असेच कायदे छत्तीसगड, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये आणून त्यांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात आला आहे. सरकारला जाब विचारणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, आदिवासी कार्यकर्ते, सामान्य नागरिक व नागरी संघटना यांच्या विरोधात व त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी हा कायदा वापरण्यात येतो. देशातील नागरिकांच्या विरुद्ध हा कायदा असून सरकार विरुद्ध जो कोणी बोलेल त्यांच्याविरुद्ध या कायद्याचा वापर करून भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सदर विधेयकावर विधिमंडळात चर्चा देखील न करता या कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या विधिमंडळात आणण्यात आलेले हे विधेयक पास झाले असले तरी याबाबत कोणत्याही अन्य मार्गाने वा राज्यपालाच्या माध्यमातून अध्यादेश आणून दडपशाही करू नये व सरकारने संविधानिक मूल्य लोकशाहीतील नागरिकांचे अधिकार याची पायमपल्ली करू नये असे निवेदनावर नमूद करण्यात आले आहे.
जनसुरक्षा विधेयक २०२४ साली महाराष्ट्र राज्यात निर्माण करण्यात आले आहे. तर १६ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य विधिमंडळात जनसुरक्षा कायदा पारीत केलेला आहे. या कायद्याचा विरोध करण्यासाठी तसेच यातील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध असुन सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्कांची पायमपल्ली करणारा हा कायदा आहे. या कायद्याच्या विरुद्ध शिवसेना उद्धवजी ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,भारत जोडो अभियान, सामाजिक संघटना व जन आंदोलन उदगीर तालुक्याच्या वतीने जनसुरक्षा विधेयक २०२४ विरोध करण्यात आला आहे. या निवेदनावर शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख प्रशांत मोरे,उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील,शहर प्रमुख बालाजी सोनाळे,शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष सचिन साबणे,तालुका समन्वयक व्यंकट सावणे, शहर संघटक संजय मतपती, उपतालुका प्रमुख महेश फुले,मुन्ना पांचाळ,शरद सावरे वाहतूक सेना ता.आध्यक्ष ,बालाजी पुरी तालुका संघटक,राहुल जाधव,प्रदीप सोनकांबळे,राजू पिटले, यादव मोरे,शिवा खरात,बुरांडे, स्वामी, यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
