त्या माजी उपसरपंचाची हत्या की आत्महत्या? मृत्यू प्रकरणात: मोठा टूविट कुटुंबीयांचे गंभीर आरोप; सोलापूर बीड हादरले..!!
संगिता इंनकर बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड मधील गेवराई तालुक्यांतील एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या या विवाहित माजी उपसरपंचाने स्वतःचा जीव गमावला आहे. नर्तकीच्या घरासमोर म्हणजे ( सोलापूर सासुरे गांव ता. बार्शी ) सोमवारी मध्यरात्री कार मध्येच उपसरपंचाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे ( वय 34 ) असे या विवाहित माजी उपसरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद यांचे मेहुणे जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नर्तकी पूजा देविदास गायकवाड ( वय 21) ही दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती शिवाय पैशासाठी तगदा लावला होता त्यातून गोविंद याने आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या मेव्हुण्यानी वैराग पोलीस ठाण्यात दाखल केली असून त्यानंतर नर्तकी पूजा विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यातील सासुरे गांव येथे माजी उपसरपंचाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधातून उपसरपंचाने आपला जीव गमावला आहे. तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यांतील रहिवासी असून गावामध्ये माजी उपसरपंच म्हणुन कार्यरत होता. सोमवारी सकाळपर्यंत काळया रंगाची चारचाकी शेतात उभी असल्याची याची माहिती वैराग पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असता गोविंद बर्गे हे मृतावस्थेत आढळून आले, पोलिसांना गाडीतच एक पिस्तूल देखील आढळून आले असून त्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आत्महत्येचे नेमके कारण काय? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. गोविंद बर्गे यांने स्वतःवर गोळी झाडून घेतली की अन्य काही घडले या दृष्टीने देखील पोलीस कसून तपास करीत आहेत.
