अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दैनिक युवक आधारचा दुसरा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य साजरा .
मार्गदर्शन व गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा सन्मान
प्रतिनिधी विकास वायाळ पनवेल
पनवेल व महाराष्ट्रात पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दैनिक युवक आधार या वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दिन उद्घाटक सुधीर कटेकर, न्यूज १८लोकमत चे सहसंपादक विलास बडे व साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्या मार्गदर्शन पत्रकारांना लाभले तसेच उद्योगपती सुधीर कटेकर , प्रसिद्ध अभिनेत्री माधवी जुवेकर दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित म्हामुनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात गुणवंत कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करत दै.युवक आधार पत्रकार टीमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असेल असा निर्धार संपादक संतोष शिवदास आमले यांनी करत दैनिक युवक आधारचा दुसरा
वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.
या सोहळ्यास विविध मान्यवर, पत्रकार बांधव,वाचक तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज 18 लोकमतचे सहसंपादक व प्रसिध्द अँकर विलास बडे, साम टीव्ही चे संपादक निलेश खरे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री माधवी जुवेकर , बाल कलाकार अर्जुनी सस्ते , दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित म्हामुनकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
आपल्या मनोगतात विलास बडे यांनी “पत्रकारिता पाठीच्या कणाप्रमाणे भूमिका बजावत ताट पणे समाजाचे प्रश्न मांडून न्याय दिला पाहिजे विविध आणखी मार्मिक मार्गदर्शन पत्रकारांना त्यांनी केले असून ‘दैनिक युवक आधार’ने अल्पावधीतच सत्य व समाजहिताला प्राधान्य देणारे काम केले आहे.
साम टीव्हीचे संपादक निलेश खरे म्हणाले, “स्थानिक प्रश्नांना न्याय देणे, सर्वसामान्यांच्या अडचणी मांडणे आणि सकारात्मक घटनांना वाचा फोडणे हेच पत्रकारितेचे खरे ध्येय आहे. ‘दैनिक युवक आधार’ हे काम प्रभावीपणे करत असून वाचकांचा विश्वास संपादन करत आहे,” असे मत व्यक्त केले.
अभिनेत्री माधवी जुवेकर यांनी “पत्रकारिता आणि कलाक्षेत्र या दोन्हींचा समाजावर दूरगामी परिणाम होतो. ‘दैनिक युवक आधार’ने सत्याचा मार्ग स्वीकारत सामाजिक बदल घडविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, सर्वांनी नागरिकशास्त्र अभ्यास करत ते जपले पाहिजे व त्याप्रमाणे वागले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी दैनिक युवक आधारला शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण, कला-संस्कृती, सामाजिक कार्य, आरोग्य व उद्योजकता अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी दैनिक युवक आधारच्या दोन वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात आला व आगामी काळात आणखी सामाजिक आणि पत्रकारितेच्या उपक्रमांना गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
दुसऱ्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्यामुळे दैनिक युवक आधारची वाटचाल अधिक प्रेरणादायी व प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र संपादक अजय कापरे, सहसंपादक मुकुंद कांबळे, कार्यकारी संपादक जगन्नाथ रासवे, उपसंपादक विलास गायकवाड, महाराष्ट्र प्रतिनिधी प्रमुख प्रदीप पाटील, कोकण विभाग विजय दुंद्रेकर,रायगड प्रतिनिधी प्रमुख एम डी भोईर, महाराष्ट्र उपसंपादक राजू शिंदे, पनवेल तालुका प्रतिनिधी प्रमुख मच्छिंद्र पाटील, बीड जिल्हा प्रतिनिधी मारुती सत्रे पनवेल महानगर प्रतिनिधी प्रमुख जगदीश क्षीरसागर, मीडिया प्रमुख अनुराग आमले, शंतनु भालेराव, आदित्य शेटे, आर्यन शेटे, राहुल माने, कैलास नेमाडे, प्रसाद हनुमंते, कैलास रक्ताटे, अण्णासाहेब आहेर कार्यक्रम नियोजक विशाल सावंत नियोजन समिती अध्यक्ष बाळा झोडगे इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले .
