अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
फलटण ग्रामीण पोलीसांकडून 12 लाखांचे मोबाईल हस्तगत; फलटण ग्रामीण पोलीसांची कामगिरी..!!
संगिता इंनकर सातारा जिल्हा प्रतिनिधी
फलटण शहर व तालुक्यांत जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत नागरिकांचे गहाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल हस्तगत करण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे. यामध्ये फलटण ग्रामीण पोलिसांनी 12 लाखांचे 47 मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीस गेलेल्या मोबाईलच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत्या. त्या अनुषंगाने फलटण ग्रामीण चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आपल्या पोलीस ठाणेकडील डी.बी पथकांतील पोलिसांना चोरीस गेलेल्या मोबाईल चा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक माहिंतीच्या आधारे शोध घेवुन हे मोबाईल राज्यांतील मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या राज्यांतील फलटण ग्रामीण पोलिसांनी शोध घेवुन हरवलेले एकूण 47 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. सदर मोबाईल हे संत. ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या दरम्यान गहाळ झाले होते. जानेवारी 2025 पासून ते ऑगस्ट 2025 पर्यंत 12.70.000 रुपये किंमतीचे 47 मोबाईल हस्तगत करण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ . वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी.बी बदने पोलीस हवालदार नितीन चतुर श्रीनाथ कदम ( तात्या ) अमोल जगदाळे हनुमंत दडस आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
