अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना वालचंदनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या; वालचंदनगर पोलिसांची निमसाखर येथे कारवाई..!!
कलावती गवळी पुणे जिल्हा प्रतिनिधी
वालचंदनगर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींवर गणेश उत्सवांच्या काळामध्ये निमसाखर येथे कारवाई करून दोघांना अटक केली आहे. सदर दोन व्यक्ती बेकायदेशीर गांजा विक्री करत असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी आपल्या पोलिस ठाणेकडील कर्मचाऱ्यांना सूचना करून कारवाई बाबत रवाना करण्यात आले होते. वालचंदनगर पोलिसांनी निमसाखर येथे जावुन छापा टाकून दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडूंन जवळपास दोन किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर पोलीस हवालदार गुलाब पाटील शैलेश स्वामी गणेश काटकर विकास निर्मळ सचिन जमदाडे अभिजीत कळसकर विक्रमसिंह जाधव गणेश वानकर किरण पेडकर आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
