अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
खुनाचा प्रयत्नातील आरोपी २ आरोपींना अटक व दोन विधीसंघर्षीत बालक ताव्यात
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी
दिनांक ०४/०९/२०२५ रोजी रात्री ११.३० वा चे सुमारास फिर्यादी नामे उमेश हरी शेलार यांचा मुलगा भावेश हा त्यांचे मित्रांचे समवेत मोबाईलवर गेम खेळत असताना दोन ते तीन दुचाकी गाडीवरील तीन ते चार अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादी यांचे मूलास अज्ञात कारणांवरुन हत्याराने डोक्यात, कानावर, हातावर चार करुन गंभरी जखमी केले म्हणून फियांदी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.न ४०३/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०९, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना आरोपीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांनी घटनास्थळ व आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी करुन गोनिय बातमीदारामार्फतीने माहीती घेतली असता त्यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी ? करण शिवाजी जमादार, वय १९ वर्षे रा. सिंहगड कॉलेजजवळ, पैरामाऊंन्ड कॅफेचे बाजुला, वडगाव बु, पुणे याने व त्याचे इतर साथीदारांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे करण जमादार याचा नमुद अंमलदारांनी शोध घेत अमनाना तो त्याचे साथीदार २. शुभम साधु चव्हाण, वय १९ वर्षे रा. जय बजरंग मित्र मंडळाशेजारी, रियांश सोसासटी, शेवटची बिल्डींग, फ्लॅट नंबर ५०३, आंबेगाव बु, पुणे व दोन विधीसंधर्षीत बालकांसह मिळून आल्याने त्यामध्ये १. करण शिवाजी जमादार २. शुभम साधु चव्हाण यांना दिनांक ०५/०९/२०२५ रोजी अटक करण्यात आली असून दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना मा. न्यायालयाने दिनांक ११/०९/२०२५ रोजी पर्वत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर झाला असून त्यांचेकडे दाखल गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा मां, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे, अवधूत जमदाडे, गणेश भोसले यांच्या पथकानं केली आहे.
खिलारे) बरिष्ठ पोलेम निरीक्षक,
