अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सेलू विभागातील गणेश विसर्जन उत्सव शांतता पूर्ण संपन्न
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू विभागातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत संपन्न झाली. मिरवणुकी साठी पोलिसांचा फौज फाटा व महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस पथक साध्या वेशातील पोलिसांची ग्रस्त सीसीटीव्ही वाच टावर द्वारे पोलिसांनी लक्ष वेधले होते.परभणी चे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार सेलूचे उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी या मिरवणुकी मध्ये बंदोबस्ताचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते.विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते.यावेळी लेझर लाइट्स किंवा घातक दिव्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला होता.डीजे मुक्त गणेश विसर्जन नवीन रुजू झालेले उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली गणेश विसर्जना अगोदर सेलु, पाथ्री, मानवत ते विभागा मध्ये रूट मार्च काढण्यात आला. दंगा नियंत्रण परीक्षाही पूर्ण करण्यात आली होती. तसेच राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) या बंदोबस्तात सहभागी होते.
पोलीस प्रशासनाने घेतलेली विशेष दक्षता..
सेलू विभागाचा हद्दीत येणाऱ्या सेलू मानवत पाथरी या विभागांमध्ये एकूण शहरी व ग्रामीण मिळून 545 गणेश मंडळाची स्थापना झाली होती..
श्री. गणेशोत्सव 2025 मध्ये सेलू उपविभागामध्ये एकूण- 807 जणांवर विविध मथळ्या खाली प्रभावी प्रतिबंध कार्यवाही करण्यात आली.तसेच सदर उत्सवा दरम्यान अवैध व्यवसाय करणाऱ्यावर एकूण – 34 गुन्हे दाखल करण्यात आले होते.
श्री गणेशोत्सव चालू असताना उप विभागामध्ये पोलिसांचे वतीने सर्वत्र पथसंचलन करण्या त आले तसेच दंगा काबू योजने ची रंगीत तालीम सुद्धा घेण्यात आली.श्री गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकी करीता उप विभागातील एकूण – 154 गावांमध्ये पोलीस अधिकारी – 18,पोलिस अंमलदार- 116
व होमगार्ड – 130 तसेच
तीन स्ट्रायकिंग फोर्स मधील 3 अधिकारी व 30 अंमलदार
असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.उपविभागात वरील तीनही शहरात व ग्रामीण भागात श्री विसर्जन मार्गावर सर्वत्र सीसीटीव्ही द्वारे करडी नजर ठेवली गेली.श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सेलू उपविभागात कुठेही डॉल्बी सिस्टीम, डीजे वाद्य वाजविले गेले नाही. मिरवणुकीत पारंपारिक सर्वत्रच टाळ मृदंग, बॅन्जो पार्टी,ढोल ताशा व हलगी असे वाद्य वाजविले जात होते.
मा.श्री रवींद्रसिंह परदेशी,पोलीस अधीक्षक, परभणी यांचे मागील वर्षीचे संकल्पनेतून सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दीपककुमार वाघमारे यांनी उपविभागामध्ये सर्वत्र गणेश मंडळाचे पदाधिकारी,शांतता समितीचे सदस्य,पोलीस पाटील यांच्या बैठकी घेऊन श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणीही डीजे वाजवणार नाही पारंपारिक वाद्य वाजवून श्री गणेश उत्सव साजरा करावा.याबाबत वेळोवेळी आवाहन केले होते. त्या आवाहनास सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन नागरिकांनी डीजे मुक्त श्री गणेशोत्सव – 2025 हा निर्वीघ्न व शांततेत पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य केले असल्याचे उपविभागीय अधिकारी श्री दीपक कुमार वाघमारे यांनी सांगितले.
