अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पाहुणा आला: १४ तोळ्यांवर डल्ला मारला आणि शाहूपुरी पोलिसांनी पाहुण्याच्या आवळल्या मुसक्या..!! शाहूपुरी पोलिसांची कामगिरी !
संगिता इंनकर सातारा जिल्हा प्रतिनिधी
साताऱ्यात मुंबईहून आलेल्या एका पाहुण्याने शाहूपुरी येथील घरातील लॉकरमधील तब्बल 14 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकाला अटक करून पोलिसांनी संशयित आरोपींकडून चोरीचे सोने हस्तगत केले आहेत. ऋषिकेश पांडुरंग देटे (वय 29) रा. कोपरखैरने नवीमुंबई ) असे या आरोपींचे नाव आहे. या बाबत शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून घरांतून 14 तोळे सोने लंपास झाल्याची तक्रार दाखल झाली होती. शाहूपुरी पोलिसांनी सखोल तपास करून अखेर संशयित आरोपी पर्यंत पोहोचले, संशयित आरोपी हा नातेवाईकांकडे दोनवेळा आला होता. अशी देखील माहिती समोर आहे. पोलिसांनी त्याला ताब्यांत घेवुन अधिक चौकशी केली असता. प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच पाहुण्यांच्या घरांत चोरी केल्याची कबुली शाहूपुरी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीस गेलेले दागिने 920,000 किंमतीचे 13.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ . वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे (डीबी) स.पो.नि. कुमार ढेरे सुरेश घोडके मनोज मदने निलेश काटकर ज्योतीराम पवार महेश बनकर अभय साबळे सचिन पवार स्वप्निल सावंत संग्राम पवार मोरे संग्राम फडतरे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
