अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
मुंबई :- लालबागच्या राजाची मूर्ती अखेर तराप्यावर चढवण्यांचं मोठं यश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आलं आहे समुद्राला आता ओहटी आली आहे भरतीचं पाणी ओसरलं आहे त्यामुळे लालबागच्या राजाची ट्राॅली जागेवरून हलली यानंतर ही ट्राॅली तराप्यांच्या दिशेला नेण्यात आली पाणी ओसरल्यामुळे मूर्तीला तराप्यांवर चढवण्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठं यश आले विशेष म्हणजे आज सकाळपासून कार्यकर्त्यांकडून तराप्यांवर मूर्ती पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते गेल्या आठतासांपासून कार्यकर्त्यांकडून अथक प्रयत्न केले जात होते अखेर त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आले
गेल्या आठ तासांचा काळ हा लालबागच्या राजाच्या भक्तांसाठी आणि मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावूक करणारा आणि धाकधूक वाढवणारा होता लालबागच्या राजा तराप्यांत विराजमान झाला असला तरी आता तराफा वाळूवर उभा आहे त्यामुळे तराफा पाण्यात नेण्याबाबत धाकधूक आहे तरीही बाप्पा अत्यंत निर्विघ्नपणे विसर्जन पार पाडले अशी भाविकांना खात्री आहे दरम्यान आता लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे
