अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिक्षक दिनानिमित्त १०१ शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व सुनिल गायकवाड मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम.
सेलू : दि 5 सप्टेंबर रोजी शहरातील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड मित्रमंडळ आयोजित शिक्षक दिनानिमित्त गुरूजनांचा सत्कार समारंभ केशवराज बाबासाहेब विद्यालया तील कै.वसंतराव खारकर सभा गृहात संपन्न झाला.या कार्यक्रमा स अध्यक्ष म्हणून दीपस्तंभ प्रतिष्ठान चे सेलू तालुका अध्यक्ष माधव लोकुलवार , प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भास्करराव कुळकर्णी ,जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, कन्या सेलूचे केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, सेवानिवृत्त अधिकारी अतुल दातार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष अमोल निकम,भा.ज.पा. तालुका अध्यक्ष गणेशराव काटकर ,शहराध्यक्ष आशोक शेलार,मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, संयोजक प्रशांतसिंह प्रकाशसिंग रघुवंशी ( ठाकुर) राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान चे अध्यक्ष अॅड मुकुंद गजमल आयोजक सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, देवेंद्र कुरा आदि उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे प्रेरनास्थान कै. दत्तात्रय हेलसकर , साने गुरूजी व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने सुरूवात झाली. या कार्यक्रमात तालुक्यातील व शहरातील विविध शाळेतील 101 शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. दिपस्तंभ प्रतिष्ठान सेलू व् व पालक मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सन्मानित केलेल्या 20 शिक्षकांचा तसेच राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक योगेश ढवारे या गुरूजनांचा शाल ‘हार ,पेण व मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बजरंग गिल्डा यांनी आयोजक सुनील गायकवाड यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले की शहरात अनेक सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते आहेत पण शिक्षकांवर प्रेम व्यक्त करणारे एकमेव सुनील गायकवाड आहेत तसेच राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे एड मुकुंद गजमल व संयोजक प्रशांतसिंह प्रकाशसिंग ठाकुर यांचे हि अभिनंदन करण्यात आले.केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,अतुल दातार, अध्यक्ष माधव लोकुलवार यांनी ही मनोगत व्यक्त करत पुढील वर्षी याही पेक्षा मोठा कार्यक्रम घेऊ असे आश्वासन देऊन संयोजक व आयोजक यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सुनील गायकवाड यांनी केले तें म्हणाले की आपण शिक्षकाप्रति आपला आदर भाव व्यक्त केला पाहिजे. शिक्षक हे एक असे पद आहे की जे सर्व अधिकारी घडवतात. या पुढे ही हा उपक्रम व्यापक प्रमाणावर घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.सूत्रसंचालन योगेश ढवारे, तर आभार अॅड मुकुंद गजमल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी देवेंद्र कुरा,शाम मुंढे,बाबासाहेब बदाले, अण्णासाहेब गायकवाड रामप्रसाद बोराडे ,शुकाचार्य शिंदे, यशराज गायकवाड,शाम मचाले, पांडुरंग पाटणकर,सुशील तोगरे, आदिनीं अथक परिश्रम घेतले.
