अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
हिप्परगा थडी येथे, गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरा.
मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड
नांदेड : नांदेड जिल्ह्यात नऊ दिवसाच्या, गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन. बिलोली तालुक्यातील हिप्पारगा थडी येथे, गणेश विसर्जन, मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे, याही वर्षी सर्व हिंदू समाज, व सर्व हिंदू बांधव यांनी गणेश नऊ दिवस बसवून आज, नव्या दिवशी मोठ्या उत्साहात हिप्परगा थडी येथील मनाड ,नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. सर्व समाजांनी मिसळून गणेश उत्सव हिप्पारगा थडी मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, यावेळी उपस्थित, बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस, व सगरोळी बीट जमादार, व होमगार्ड, व गावातील , पत्रकार राजू आमेटवार, व पत्रकार मारोती एडकेवार, पोलीस पाटील शंकरआप्पा मठपती, तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव मामडे, व सर्व हिंदू समाज बांधव, मोठा उत्साहात गणेश विसर्जन करण्यात आला. चिमुकले विद्यार्थ्यांनी, वारकरी, संप्रदायातील विठू माऊली गजर, सादर करण्यात आले.व युवा तरुणांनी गणपती बाप्पा मोरयाच्या, जय घोषणात विसर्जन साजरा करण्यात आला.
