अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र,सेलू युनिटच्या वतीने ईद मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, सेलू युनिटच्या वतीने ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि एकूण १५९ जणांनी रक्तदान केले.या कार्यक्रमात एस.आय.ओ. (SIO) सेलू युनिटने विशेष सहकार्य करून महत्त्वाची भूमिका बजावली. शिबिर यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यामध्ये युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र सेलू युनिटचे सेलू शहर अध्यक्ष नोमान सकलैन, मोईन सिद्दीकी (अमीर मुकामी JIH सेलू), इस्माईल शेख, बिलाल हरमैन, शोएब हाशमी, जुबैद हसनैन, इब्राहिम बगवान, जुबेर सैय्यद, शजी सिद्दीकी, ज़की सिद्दीकी सर, इमामुद्दिन शेख सर, डॉ.अब्दुल मजीद, अब्दुल गफूर साहेब, सैय्यद इसहाक साहेब, सय्यद साजीद, अनीस अन्सारी शेख सज्जीद, अमजद बगवान व इतर अनेकांचा समावेश आहे.रक्तसंकलन यशस्वी करण्यासाठी शासकीय रुग्णालय परभणी येथील वैद्यकीय पथकाने विशेष योगदान दिले. या पथकात डॉ. संकेत वाघ, विकास कांबळे, असाराम गीते, राम धेंगडे, किरण कदम, शुभम अंबूरे आणि रोकडेवार यांचा समावेश होता.आयोजकां नी सर्व रक्तदाते, सहकार्यकर्ते व वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार मानले आणि सांगितले की हे शिबिर मानवसेवेच्या भावनेचे उत्तम उदाहरण आहे.
