अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सकर्तव्यदक्ष विशाल खांबे यांनी फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून स्वागत !
संभाजी पुरीगोसावी सातारा जिल्हा प्रतिनिधी
फलटण उपविभागाचे पोलीस अधिकारी ( डीवायएसपी ) म्हणून नूतन विशाल कृष्णांत खांबे यांनी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पोलीस मुख्यालयात त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. तत्कालीन फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांची नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदावर बदली झाल्याने या पदावर विशाल कृष्णांत खांबे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ( दि. 4 ऑगस्ट 2025 ) रोजी सातारा जिल्हा पोलीस दलातील चार उपविभागीय ( डिवाय एसपी ) दर्जेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. यामध्ये कराड,फलटण, वडूज आणि कोरेगांव,वाई येथील अधिकाऱ्यांचा समावेश होता. सातारा जिल्ह्याला नव्याने चार ( डीवायएसपी ) मिळाले असून यामध्ये ( डीवायएसपी ) रणजीत सावंत, अजित टिके,सुनील साळुंखे, राजश्री पाटील या अधिकाऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. तर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे हे देखील नव्याने सातारा जिल्हा पोलीस दलात रुजू झाले असून ते यापूर्वी जालना जिल्हा पोलीस दलातील अंबड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यरत होते. आता ते फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
