अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुंबई येथील मराठा मोर्चातील आपघातातील पेशंटला चापके आर्थिक मदत
प्रतिनिधी श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बोराळा गावातील मराठा समाज बांधव मुंबई येथे सुरू असलेल्या संघर्ष योधा मनोज जरागे पाटील यांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी दिनांक 2 सप्टेंबर रोजी बोराळा येथुन आपल्या गावातील काहि मराठा समाज बांधवां सोबत रेल्वेने मुंबई कडे रवाना झाले होते त्या प्रवासात वाशी येथे घाईगडबडीत पाय घसरून रेल्वतुन पडल्याने गोपीनाथ जाधव यांना मोठी दुखापत झाली.
महाराष्ट्र राज्यातील मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुंबई येथे राज्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबई च्या दिशेने गेली होते त्या मध्ये स्वतः जातीने स्व खर्चाने आंदोलन स्थळीं जात होते यातच वसमत तालुक्यातील बोराळा येथील मराठा बांधव आंदोलनातील सहभागी झालेला मराठा सेवक श्री. गोपीनाथ सोनाजी जाधव हे वाशी येथे चालत्या रेल्वेमधून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मोठी गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबई येथील केईएम हॉस्पिटल येथे त्यांच्या सोबत असलेल्या गावकरी यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्या संदर्भात माहिती मिळताच वसमत तालुका अध्यक्ष सेना उबाटा गटाचे राजु पाटिल चापके यांना मिळाली त्यानंतर चापके पाटील ह्यांनी केईएम रूग्णालयात पेशंट ची भेट घेऊन चौकशी करून उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जाधव कुटुंबाना
आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी शिवसेना तालुकाप्रमुख राजुदादा चापके यांनी रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून व तसेच डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक अशी मोठी आर्थिक मदत पेशंट च्या उपचारासाठी केली आहे.
