स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
. म्हसावद येथील कै स्वातंत्र्य सैनिक पं ध थेपडे माध्यमिक विद्यालयात दिनांक 31ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भावनिकनिसर्ग रम्य वातावरणात पार पडला,शाळेत तब्बल 22वर्षानंतर माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र जमल्याने आनंदाचे आणि जुन्या आठवणींचे क्षण भर पावसात अनुभवायला मिळाले यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री वाय आर जाधव सर,माजी प्रा राजू पाटील सर, श्री डी एस खोडपे सर, शाळेचे उप मुख्याध्यापक श्री जी डी बच्छाव सर , एस के भंगाळे सर, संजय पवार सर, देशमुख सर, श्री एस एम पिंगळे सर,सौ, चव्हाण मॅडम, सौ वंदना मॅडम, एस डी हुजरे मॅडम, आदी शिक्षक उपस्थित होते, यावेळी प्रथम गुरू पूजन करून सर्व गुरुजनाना सर्व विद्यार्थ्यांनी नतमस्त होऊन नमन करण्यात आले, यावेळी शिक्षकांनी देखील यावेळी आशीर्वाद दिले,यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण व व्यसन मुक्तीवर नाटिका करण्यात आले,तसेच श्री वाय आर जाधव सर यांनी व्यसन मुक्ती वर मार्गदर्शन केले,तर श्री राजू पाटील सर यांनी तुमच्या येणाऱ्या पिढीला मोबाईल पासून लांब ठेवा असे मार्गदर्शन केले, बच्च्छाव सर यांनी तुमच्या मुलांना संस्कार चांगले लावा व सर्वांनी आपल्या आई वडिलांचा मान ठेवा व त्याचा आदर करा असे मोलाचे मार्गदर्शन केले व श्री संजय पवार सर यांनी सांगितले की आप बीण जे काही गरीब असतील त्यांना तुम्ही तुमच्या परीने काही तरी मदत करा व ज्येष्ठांचा मान ठेवा, असे तोलामोलाचे मार्गदर्शन यावेळी सर्व शिक्षकांनी केले,यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे मन भरून आले यावेळी मुलामध्ये बबन वाघ,गिरीश शार्दुल,वाल्मीक पाटील, अतुल पाटील, किशोर बडगुजर, जयंत पाटील,राहुल साबळे,राहुल, रजाणे, तृषाल मराठे,मोहन मिस्तरी, फिरोज पटेल,गुलाब चौधरी,विजय मोरे,संदीप सोनवणे,अतुल शिवदे,शरद पवार, योगेश चिंचोरे,योगेश पाटील,आशिष चव्हाण,मोहसीन शेख, मिलिंद सोनवणे ,संदीप जाधव,गोरख बेलदार,आदी तर मुलींमध्ये हेमलता महाजन, दीपमाला जाधव,कविता पाटील, अंकिता कटारिया,गायत्री माळी,सुमित्रा सोनवणे, शारदा पाटील, सुवर्णा माणके,पूनम पाटील,हर्षदा पाटील, ज्योती शिवदे,रेखा चव्हाण,सुरेखा पाटील, ज्योत्स्ना भट, चित्रा चव्हाण, वैशाली कदम, अर्चना मराठे आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते
