अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
खासदार रवींद्र चव्हाण यांची हिप्परगा थडी, येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेट
मारोती एडकेवार नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड: नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण, यांची हिप्पारगा थडी येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेट.दिनांक 26 /8/2025 रोजी पासून सुरू असलेल्या, अतिवृष्टी पाऊस व तेलंगाना येथील निजाम धरणांमधून, सोडलेल्या पाण्यामुळे, व बारूळ येथील धरणातून व मना धरणातून सोडलेल्या पावसामुळे, लेंडी नदी व मांजरा नदीला सुद्धा मोठा पूर आला होता, हजारो हेक्टर जमीन, हे पाण्याखाली गेली व अनेक घरांमध्ये पाणी घुसून सर्व शेतकरी, व गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेती पाण्याखाली, व घरांचे पंचनामे करून,ताबडतोब हिप्परगा थंडी येथील रहिवाशांना,शासकीय मदत करून देण्याची,विनंती हिप्परगा थडी चे सरपंच इनामदार रयबर यांनी निवेदनाद्वारे,खासदार रवींद्र चव्हाण यांना दिले.खासदार रवींद्र चव्हाण यांनी, उपस्थित सर्व शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना पूर्णपणे शासकीय मदत मिळवून देण्याची, आश्वासन दिले. उपस्थित हिप्परगा थडी, काँग्रेस पक्षाचे शाखा अध्यक्ष सय्यद उमर, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव हिप्पर्गेकर, फाजलबेग इनामदार,सय्यद नजीर साहब, सय्यद महमूद साहब, जकोजी एडकेवार, सय्यद इरफान,दीपक एडकेवार व सर्व ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य, शेतकरी व सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
