अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मराठा आंदोलनाचा कुठेचं विरोध केला नाही व OBC आंदोलनाला पाठींबाही दिलेला नाही
राजे मुधोजी भोसले महाल नागपूर
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
मुंबईत आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन सुरू आहे.
यात महाराष्ट्रातील लाखों मराठा सहभागी झाले आणि होत आहेत. या आंदोलनाच्या संदर्भात माध्यमानीं माझी भुमीका जानुन घेतली. त्यावर मी भुमीका जाहीर केली की, कोणाच्या अधिकारातून आरक्षण नको. “मराठा समाजाला शिक्षणासाठी व नोकरीसाठी मराठा म्हणून हक्काचं आरक्षण मिळावे. जेणेकरून ते टिकेल.” मी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन शुभेच्छाही दिल्या आहे.
परंतु माध्यमातील काही माध्यमानीं बातमी चालवली की मी जरांगेनां फटकारलं, मराठा आंदोलनाला विरोध केला, OBC आंदोलनाला मी पाठींबा दिला. हे अत्यंत चुकीच आहे. मी मराठा आंदोलनाचा कुठेचं विरोध केला नाही. व OBC आंदोलनाला पाठींबाही दिलेला नाही. या माध्यमातून माझी माध्यमानां विनंती आहे की, चुकीची बातमी चालवू नका. ह्या चुकीच्या बातमीमुळे मराठा समाजाच्या भावना दुखवल्या जात आहे. समाजात गैरसमज निर्माण होत आहे. मराठा समाजाच्या भावनाचा कृपया आदर करा. ह्या चुकीच्या बातम्यामुळे समाजांच्यां भावना दुखवल्या आसतील तर मी दिलगीरी ही व्यक्त करतो.
एक मराठा लाख मराठा !राजे मुधोजी भोंसले
👆🏾👆🏾
