अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुण्यात ब्रेक-अप झाल्याने प्रेयसीवर गोळीबाराचा प्रयत्न :- बाणेरमधील घटना युवती बचावली; घटनास्थळी बाणेर पोलीस ठाणेचे अधिकारी दाखल..!!
संगीता इंनकर पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुण्यातील बाणेर भागात प्रेम संबंधात नकार दिल्याने प्रेयसीवर पिस्तुलातून गोळीबार केल्याचा प्रयत्न बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शुक्रवारी घडली आहे. यामध्ये नेम चुकल्याने संबंधित तरुणी बचावली आहे. तक्रारदार तरुणी ही एमबीए अभ्यासक्रम करीत होती. ती बाणेर भागातील एका खाजगी कंपनीत प्रशिक्षण घेत होती. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी तरुणी कंपनीकडे निघाली होती. त्यावेळी आरोपीने तिला इमारतीच्या आवारांत अडविले आरोपीने घरपोच खाद्यपदार्थ पोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉय सारखा वेशभूषा केली होती. मात्र संबंधित तरुणीने बोलण्यास नकार दिल्याने आरोपींने त्याच्याकडील पिस्तूलने तरुणीच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या यावेळी तरुणीने आरडाओरडा केला आणि नेम चुकल्याने तरुणी बचावली आरोपींने तिथून आपल्या दुचाकीवरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. संबंधित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. संबंधित आरोपीवर यापूर्वी पिंपरी-चिंचवड अंतर्गत एका पोलीस ठाण्यात चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. घटनास्थळी सी.सी.टीव्ही नाहीत मात्र पसार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली आहे.









