वृक्ष संवर्धन हेच खरे पर्यावरण रक्षण प्राचार्य डॉ.अनिल पाटील
जळगाव जिल्हा ब्युरो चिफ हमीद तडवी
दिनांक 27/08/25 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वृक्षारोपण अभियान अंतर्गत श्री. व्ही.एस. नाईक महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या उपक्रमात महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. हेमंत शेठ नाईक, सचिव मा. मुरलीधर कानडे तसेच संचालक मंडळाचे मान्यवर सदस्य उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर महाजन आणि सहाय्यक अधिकारी प्रा. एल.एम. वळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रत्यक्ष सहभाग घेतला.
तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गातील मान्यवरांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यामध्ये प्रा. तेजस दसनुरकर, डॉ. एस.जी. चिंचोरे, प्रा. सी.पी. गाढे, कार्यालयीन अधीक्षक श्री. युवराज बिरपन , आर.एस. पाटील, सतीश वाघ व रितेक गाडे आदी कार्यालयीन कर्मचारी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
या उपक्रमात विविध औषधी, फळझाडे व पर्यावरणपूरक रोपांची लागवड करण्यात आली. महाविद्यालय परिसर हिरवागार करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाचे भान जपण्यासाठी या वृक्षारोपणाला विशेष महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्यांनी उपस्थितांचे आभार मानून, “वृक्ष संवर्धन हेच खरे पर्यावरण रक्षण आहे” असा संदेश दिला.
