अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दरोडयाचा कट उधळून तीन सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारास केली अटक.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :दि.२५/८/२०२५ रोजी युनिट ०२ पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार हे परिमंडळ ०२ हददीत गणपती उत्सवाच्या अनुषंगाने गर्दीमध्ये होणा-या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये पेट्रोलींग करीत असताना गुन्हे शाखा युनीट ०२ कडील पोलीस अमंलदार शंकर नेवसे यांना गुप्त माहिती मिळाली की. काही रेकार्डवरील गुंड इसम हे भापकर पेट्रोलपंप नजीक असलेल्या भुयारी मार्गातून येणा-या जाणा-या लोकांना लुटण्याच्या तयारीत आहेत सदर बातमी वरिष्ठांना कळवून लागलीच छापा कारवाई केली असता यापूर्वीचे दरोड्याच्या प्रयत्न, चोऱ्या यासारखे गंभीर गुन्हे असलेले आरोपी नाव १) करण हरिदास जाधव, वय २४ वर्षे, रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा, पुणे २) रवि यल्लप्पा गायकवाड, वय ४२ वर्षे, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा कॉलनी, मुंढवा पुणे ३) जयश परशुराम गायकवाड, वय २७ वर्षे, रा सर्वोदय कॉलनी मुंढवा पुणे व इतर दोन इसम दरोड्याच्या प्रयत्नात असताना दिसून आले पैकी अ.क्र. ०१ ते ०३ यांच्या कडून घातक शस्त्रे, हॅण्डग्लोज, कटवाणी इत्यादीसारखा मुददेमाल जप्त करुन दरोडयाचा कट उधळला आहे. नमुद आरोपीवर विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. मुंढवा पो.स्टे. ३४८/१९ ना.द.वि. ४५२,३५४, पोस्को ७ व ८ स्वारगेट ९५/२२ भा.द.वि. कलम ३९९,४०२४(२५) ३७ (१) सदर गुन्हयातील आरोपी हे रस्त्याने येणारे जाणारे, बसमधील गर्दीमधील लोकांना लुटमार करणारे असून त्यांचेवर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे.
सदरकामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ०२ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, आशिष कवठेकर, सपोनि संजय जाधव, नेवसे, उज्वल मोकाशी, विजयकुमार पवार, शंकर कुंभार, संजय आबनावे, चा.पो.अं. विनायक वगारे पोलीस अंमलदार निखिल जाधव महिला पोलीस अंमलदार साधना ताम्हाणे, राहुल शिंदे विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओमकार कुंभार यांचे पथकाने केली.
