अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर
एम. पी. डी. ए. मधील पाहीजे आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
येरवडा :मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी इसम नाव विशाल शंकर सिंह यास महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळूची तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम, १९८१ (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक रोमन ५५) (दुरूस्ती १९९६) (दुरूस्ती २००९) (दुरूस्ती २०१५) अन्वये दि.०८/०४/२०२५ रोजी स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले होते. तसेच नमूद इसमास स्थानबध्द करून नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्यात यावे असे नमुद करण्यात आले होते. परंतु सदर इसम हा मागील ०४ महीन्यापासुन फरार झालेला होता.
दि.२२/०८/२०२५ रोजी पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विशाल शंकर सिंह, वय २१ वर्षे, रा. ओंकार गणेश मंदिराजवळ, संगमवाडी, पुणे हा शिवाजीनगर, पुणे येथे येणार आहे. त्यानंतर सदर बातमी त्यांना पोलीस उप-निरीक्षक महेश फटांगरे यांना सांगितली. त्यानंतर सदर बातमी पोउपनि महेश फटांगरे यांनी वपोनि येरवडा पोलीस स्टेशन यांना सांगुन पोउपनि महेश फटांगरे व सोबत पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, विशाल निलख असे सदर ठिकाणी रवाना झाले. शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतुन जावुन तेथे सदर इसमास ताब्यात घेऊन एम.पी.डी.ए. आदेशाची बजावणी करुन त्याची रवानगी नागपुर मध्यवर्ती कारगृह येथे करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०४ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ठाकर यांचे सुचनाप्रमाणे उपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक महेश फटांगरे, पोलीस अंमलदार सचिन शिंदे, विशाल निलख, मोनिका पवार व अमोल गायकवाड यांनी केलेली आहे.
