अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेतर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा संपन्न
प्रतिनिधी गणेश तळेकर
मुलांना इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वाचे ज्ञान व्हावे, त्यांचा इतिहास कळावा, त्यांच्या शौर्य- कथा कळाव्या या प्रामाणिक उद्देशाने माननीय बालरंगभूमी परिषद मुंबई शाखेच्या अध्यक्षा माननीय नीलम ताई शिर्के- सामंत आणि त्यांच्या मध्यवर्ती समितीतील सदस्यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम जाहीर केला .सर्व शाखांनी हा कार्यक्रम आपापल्या शाखेत राबविला. बृहन्मुंबई शाखेनेही पावसाने थैमान घातल्यामुळे हा उपक्रम ऑनलाइन घेतला.
शिवाजी महाराजांच्या काळातील कुठलही व्यक्तिमत्त्व सादर करणे, हा पहिल्या एकल गटाचा विषय म्हणजे ५ते१० वर्षे वयाच्या मुलांचा. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत
कुठलेही प्रसंग सादर करणे हा गट नंबर दोन एकल ,म्हणजेच ११ ते १५ वर्षे वयाच्या मुलांचा विषय .आणि महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत कुठलाही प्रसंग समूहाने सादर करणे हा विषय होता पाच ते पंधरा या वयातील मुलांचा.
८३ मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला .कथा, पोवाडा ,नाटुकले, पाळणा, नाट्यछटा ,गाणी इत्यादी विविध कलाप्रकार मुलांनी सादर केलेत. सगळ्यांचेच सादरीकरण अतिशय सुंदर होते .तेही इतक्या कमी वेळात त्यांनी ते सादर केलेत. शाळांच्या परीक्षा होत्या, सुट्ट्या होत्या, पाऊस होता तरीही शाळांनी, संस्थांनी स्पर्धेत भाग घेतला .त्यासाठी सगळ्याच शाळांचे, संस्थांचे, त्यांना प्रेरित करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक आभार.
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते माननीय श्री.अनंत पेडणेकर आणि अभिनेते ,डान्सर कोरिओग्राफर, डबिंग आर्टिस्ट, ‘कलाविष्कार कला अकॅडमी’ आणि’ कलाविष्कार एंटरटेनमेंट आणि प्रोडक्शन हाऊस’ चे संस्थापक श्री. निखिल चव्हाण यांनी परीक्षक म्हणून अतिशय पारदर्शकपणे काम केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बृहन्मुंबई शाखेच्या कार्याध्यक्षा ज्योती निसळ,आसिफ अन्सारी, विश्वास धुमाळ, कृष्णा पाटील आणि माध्यम प्रमुख गणेश तळेकर यांनी सहकार्य केले.










