अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शेतकरी राजाला आधार द्या
कर्जमुक्ती व नुकसानभरपाई तात्काळ मिळाली पाहिजे !
प्रतिनिधी : दौलत सरवणकर
पुणे – महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी राजाचे हातातोंडाशी आलेले पीक *पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देणे अत्यावश्यक आहे.
आज राज्यातील शेतकरी दारिद्र्यात आहे. दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. कारण कर्जमुक्तीच्या आशेवर ते जगत आहेत. मात्र निवडणुकीपूर्वी युती सरकारने दिलेले आश्वासन अद्यापही हवेत आहे. जाहीरनाम्यात स्पष्टपणे ” *कर्जमुक्ती तात्काळ”अशी घोषणा करून सत्ता मिळवली, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळालेला नाही.
शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता –
१) अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी.
२) निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करून कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करावी.
३) शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस व दीर्घकालीन धोरण तयार करावे.
शेतकरी राजाला न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही.
आजही शेतकरी हेच आपल्या राज्याचे खरे बळ आहे, पण हाच शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पाडला जात आहे, हे दुर्दैवी आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा आहे.शेतकऱ्यांचा आवाज आम्ही थांबू देणार नाही
आपलाच : श्री आतुलराज नागरे.
राज्य संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
