अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पर्वती पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
दहशत माजविण्यासाठी जवळ देशी पिस्टल बाळगणा-या आरोपीस पर्वती पोलिसांनी केली अटक
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :दिनांक २१ऑगस्ट २०२५ रोजी रात्री 09:0वा. ते दि. २२ऑगस्ट २०२५ रोजी रात्रौ ०२:०० वा. च्या दरम्याण मा. वरिष्ठांचे आदेशान्वये पर्वती पोलीस स्टेशन हद्दित कोंम्बिंग ऑपरेश दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदारासह पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन सापाळा रचुन आरोपीचे नाव शुभम दिलीप पवार, वय १९ वर्षे, रा. स.नं. ५४/२, चंद्रीका मेडीकल जवळ, ग.नं. ३, आरनेश्वर सहकारनगर पुणे यांस अत्यंत शिताफीने पकडुन त्याच्या ताब्यातुन एकुण ३५,२०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे गुरनं. २६३/२०२५ भारतीय हात्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०३ श्री.संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. किरण पवार, पोलीस हवा प्रकाश मरगजे, पोलीस अंमल्दार महेश मंडलिक, सद्दाम शेख, मनोज बनसोड, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, अमित चिव्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, यांनी केली आहे.
