अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अकोला जिल्ह्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार :- नूतन जिल्हाधिकारी वर्षा मीना… अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच महिलाराज..!!
संगीता इंनकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोला जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना यांनी 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. याबाबत अजित कुंभार यांच्या बदलीचे आदेश धडकल्याने नव्या पदस्थापने ठिकाणी वर्षा मीना यांनी पदभार स्वीकारला आहे. अकोला जिल्ह्यात मी नेहमीच प्रयत्नशील राहणार अशा प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यावेळी मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार हे कोठेही उपस्थित दिसले नव्हते त्यांनी आपली स्वाक्षरी करून मुंबईला रवाना झाले होते. मात्र मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार नियुक्तीच्या प्रतीक्षेत राहिले आहेत. त्यांची पदस्थापना ही मंत्रालयात किंवा पश्चिम महाराष्ट्रांत नियुक्ती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सन 2018 च्या तुकडीतील वर्षा मीना या (आयएएस अधिकारी ) आहेत. त्या प्रथम अमरावती येथे परिविक्षाधीन अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यानंतर नाशिक येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांची बदली जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली होती. आता सध्या अकोला जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यातील आढावा आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची ओळख आणि परिचय करून घेतला आहे. मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार हे 25 जुलै 2023 रोजी अकोला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. मात्र त्यांच्या पुढील पदस्थापनेच्या आदेश जारी झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना मंत्रालयात नियुक्ती देण्यात येते की पश्चिम महाराष्ट्रांत पदस्थापना मिळते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
