अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
जागतिक जेष्ठ नागरिक दिना निमित्ताने “आर एफ सी एम ” संस्थेतर्फे जेष्ठ नागरिकांसाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा संपन्न….
मुंबई प्रतिनिधी लव क्षीरसागर
जागतिक जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी, संपूर्ण भारतातून जेष्ठ गायकांनी सहभाग नोंदवीला होता. संपूर्ण स्पर्धेत लखनौ, पंजाब, महाराष्ट्रातून सातारा, ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे अशा विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले होते. 200 च्या वर स्पर्धेत सहभागी झाले होते, आणि महाअंतिम सोहळ्यात 20 उत्तम स्पर्धक गायक यांची निवड करण्यात आली होती.
आयोजक, गायक श्री. सुनील वाडकर, यांच्या रफीज फॅन क्लब मुंबई (RFCM) संस्थेच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिनी आज विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठया दिमाखात वाद्यवृंदासह संपन्न झाला.
गेली 12 वर्षे रफीज फॅन क्लब मुंबई (RFCM) संस्था ही संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या उभरत्या कलाकारांसाठी अहोरात्र झटत आहे. त्याच कार्याचा भाग म्हणून दरवर्षी स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी जेष्ठ नागरिकांना पसंती देऊन खास जेष्ठ नागरिकांसाठी ही गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या गायनाच्या महाअंतिम सोहळ्यात 75 वर्ष पूर्ण जेष्ठ व्यक्तींना, तसेच वृद्धाश्रमातील व्यक्तीसाठी 300 आसने राखीव ठेवण्यात आली होती.
संगीत रसिकांनी या जेष्ठ नागरिकांच्या अनोख्या गायन स्पर्धेला मोठया संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाचा उत्साह वाढविला.
जेष्ठ नागरिक गायन स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात जेष्ठ अभिनेते जयंत ओक, श्री स्वामी समर्थ भूमिका साकारणारे अभिनेते श्री. अशोक कुलकर्णी, समाजसेविका डॉ. स्नेहा देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक सुनील वाडकर यांनी इच्छुक गायकांनी आपल्या ‘रफीज फॅन क्लब मुंबई ‘ या संस्थेमध्ये जोडल्यास पूर्ण पणे गायन क्षेत्रात व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले
