एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या मृदगंध स्पर्धेत गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलला विजेतेपद…

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या मृदगंध स्पर्धेत गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलला विजेतेपद…

प्रतिनिधी गणेश तळेकर 

बारामती, ता. 21 : येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मृदगंध 2025 सांस्कृतिक स्पर्धेत कृषी उदयोग मूल शिक्षण संस्थेचे गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलने सादर केलेल्या स्वप्न एक शांततेचे या नाटिकेस प्रथम क्रमांकाचा मृदगंध करंडक प्रदान करण्यात आला.

बुधवारी (ता. 20) गदिमा सभागृहात झालेल्या स्पर्धेत यंदा 24 शाळांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून मृदगंध विविध गुणदर्शन स्पर्धा दरवर्षी घेतली जाते.

या स्पर्धेत विदया प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर शाळेच्या पालक व परिक्षा या लघुनाटिकेस द्वितीय तर विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या पथनाट्याच्या सादरीकरणास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान केले गेले.

झैनुबिया इंग्लिश मिडीयम स्कूलला उत्तेजनार्थ प्रथम तर विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल एस.एस.सी. बोर्ड शाळेस उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

या स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनय स्त्री पारितोषिक- अनन्या प्रमोद धायगुडे (वि.प्र. मराठी माध्य. शाळा) व यशोधरा ज्योतीपाल खरात (आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल) यांना तर स्त्री अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक ईश्वरी परशुराम दिवटे (बा.न.प.शाळा क्रं. पाच), श्रेया दत्तात्रय कळसाईत (आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल) व श्रावणी मोहन कदम (वि.प्र. मराठी माध्यमिक शाळा) यांना मिळाले.

उत्कृष्ट अभिनय- पुरुष पारितोषिक- सत्यम आटोळे (विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदीर), सोहम नवनाथ शिंदे (न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल), राज मनोज सोनवणे (अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचोली) यास उत्तेजनार्थ तर सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयाचे पारितोषिक आयुष लक्ष्मण बंडगर (वि.प्र. विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर) यास मिळाले.

उत्कृष्ट नेपथ्य व वेशभूषा- सुप्रिया लोणकर व पूजा जगताप (गुरुकूल इंग्लिश मिडीयम स्कूल, का-हाटी), उत्कृष्ठ लेखक- पी.एन. कोरे (वि.प्र. मराठी माध्यमिक शाळा), उत्कृष्ट दिग्दर्शन- कोमल चांदगुडे व प्रीती लोंढे (गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल), सांघिक अभिनयरत्न विशेष पुरस्कार- गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल का-हाटी यांना दिला गेला.

अभिनेत्री शिवाली परब यांच्या हस्ते व अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले.

या स्पर्धेसाठी यश रुईकर, ऋचिका खोत व सुशांत जंगम यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. प्रास्ताविकात सचिन पवार यांनी फोरमच्या कामाचा आढावा घेतला. ज्ञानेश्वर जगताप, लक्ष्मण जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो- – बारामती- एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मृदगंध 2025 स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारे गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link