अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संजय चव्हाण यांनी परभणी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तर रघुनाथ गावडे यांची मुंबईला बदली..!!
संगीता इनकर परभणी जिल्हा प्रतिनिधी
मुंबईतील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजय चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी मावळते जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून परभणी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. यावेळी मावळते जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी चव्हाण यांचे स्वागत करीत पदभार उत्स्फूर्त केला. चव्हाण यांच्या नियुक्तीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव संजय उमराणीकर यांनी काढले आहेत. दरम्यान नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण हे एमपीएससी मधून 1993 साली उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांनी विविध पदावर काम केल्याचा अनुभव आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची बदली झाल्याने नव्याने संजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मागील दोन वर्षात जिल्ह्यामध्ये शासकीय योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी उत्तम कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडल्या. गावडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात विविध योजना व विकास कामे झाली आहेत.*
