अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वर्धा येथील राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात ग्रामीण पत्रकारांच्या मूलभूत मुद्द्यावर ठरावं
ग्रामीण भागातील पत्रकाराची हेळसांड थांबवावी
प्रतिनिधी श्रीहारी अंभोरे पाटील
वर्धा जिल्ह्यातील.पत्रकार संरक्षण समितीचे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे (दि १७ ऑगष्ट २०२५) रोजी झाले. राज्यभरातील ग्रामीण भागातून बहुतांशी पत्रकारांच्या उपस्थितीत अतिशय भारलेल्या वातावरणात हे संमेलन पार पडले. या प्रसंगी ग्रामीण कष्टकरी पत्रकारांच्या मूलभूत मुद्द्यावर ठरावात राज्य शासनाकडून त्यांच्या माहिती विभागाकडून सातत्याने दुर्लक्षित व असुरक्षित राहिलेल्या ग्रामीण पत्रकाराना उपेक्षेचे आयुष्य जगावे लागत आहे, आमच्या मूलभूत मागण्या आज पर्यंत आलेल्या कुठल्याही सरकारने समजून घेतल्याचा नसल्याने आता पुन्हा आमच्या न्यायासाठी हा आमच्या हक्काचा लढा आम्हांला तीव्र करावा लागेल असा सूर दिवसभरात झालेल्या चर्चेत दिसून आला.
वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या यात्री निवास बापुकूटीच्या परिसरात पत्रकार संरक्षण समितीचे राज्यस्तरीय संमेलन रविवार दि १७ रोजी झाले, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे हे या पत्रकार संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.
पत्रकार महर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार राजेश बकाने यांचे हातून दिपप्रज्वलन करून पत्रकार संमेलनाचे उदघाटन झाले. यावेळी दिवसभरात अनेक लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला, यावेळी दैनिक सकाळचे निवासी संपादक (नागपूर ) प्रमोद काळबांडे, माजी खासदार रामदास तडस,,आमदार दादाराव केचे, आमदार सुमीत वानखेडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, जेष्ठ पत्रकार व्याख्याते राम खुर्दळ(नाशिक) लोकमत(नागपूर)उपसंपादक नरेश डोंगरे, जेष्ठ पत्रकार संदीप खडेकर,जेष्ठ पत्रकार प्रा.राजू गोरडे, यशदाचे डॉ. अंकुश बुरंगे, पत्रकार संरक्षण समितीचे सचिव अनिल चौधरी (पुणे), समाजसेवक इमरान राही, समाजसेवी सुनील बुरांडे, जेष्ठ पत्रकार शेख सत्तार, नागपूर जिल्हाध्यक्ष महिला पत्रकार माहीन पठाण इत्यादी मार्गदर्शक उपस्थित होते,
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने मान्यवर व प्रमुख सेवाव्रती पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. प्रस्तावनेत रविराज घुमे यांनी पत्रकार संमेलनाचा मूळ उद्देश मांडला, त्यानंतर पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ यांनी ग्रामीण भागातील कष्टकरी पत्रकारांच्या मूलभूत अडचणी व आस्थेचे मुद्दे विषद केले. त्यात प्रामुख्याने “ज्या भूमीत गावाकडे चला असा संदेश महात्मा गांधींनी दिला त्याच पवित्र सेवाग्राम मध्ये होणाऱ्या ग्रामीण पत्रकाराच पत्रकारितेतील मूलभूत स्थान व त्याच्या धडपडीला शासन, प्रशासन व समाजाकडून कायमच उपेक्षा झाली आहे. गावाच्या विकासात सातत्याने आवाज उठवणाऱ्या जेष्ठ पत्रकाराना ग्रामदूत म्हणून सन्मान दिला पाहिजे, शासकीय पुरस्कार त्यांना देण्यात यावे, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या अशासकीय समित्या, अधिस्वीकृती समित्या, पत्रकार कल्याण निधी समिती, पत्रकार हल्लाविरोधी समितीत ग्रामीण पत्रकाराना नेहमीच डावलले जाते, प्रसंगी पालकमंत्री स्थानिक आमदार खासदार यांच्या मर्जीतील मंडळी त्यावर निवडल्याच वास्तव आहे, या बाबतीत अनुभवं लक्ष्यात घेऊन ग्रामीण पत्रकाराना संधी द्यावी, ज्या पत्रकार संघटनेला शासनाने नेहमीच जवळ केले त्यांनी आमच्या सारख्या प्रामाणिकपणे कार्यरत संघटनाना नेहमीच डावलले हे वास्तव आहे, हे थांबवा,
ग्रामीण पत्रकारांच असुरक्षित जीवन, त्यात मारहाण झाली दमदाटी झाली तर न्याय मिळत नाही, उलट अन्याय होतो हे थांबवा, आर्थिक विवंचना असताना अनेक वर्षे राबणारे अनेक ग्रामीण पत्रकार आहेत, त्यांना बस, रेल्वेत पास सवलत द्यावी, प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन बांधावे. जेष्ठ ग्रामीण व साप्ताहिक मधील पत्रकार यांना उतारवयात पेन्शन व आजारात मोफत उपचार मिळावे, पत्रकार जल्याण निधीचा उपयोग अनेक गरीब पत्रकाराना होतं नाही या योजनेत बदल करावा त्यात ग्रामीण पत्रकारा ना साहाय्य मिळालं पाहिजे अश्या मागण्यांचे ठरावं मांडले, तसेच जेष्ठ पत्रकारांच्या उपेक्षेबद्दल बोलतांना त्यावर दिवगत पत्रकार केदारनाथ दायमा, नाशिकचे जेष्ठ पत्रकार सुरेश भोर यांच्या आजारात शासनाने कवडीही मदत केली नाही, प्रसंगी उपचारासाठी शासनाकडे आर्थिक उपेक्षा झाल्याचे अनेक उदाहरणे दिली, कै यशवंतरावं पत्रकार कल्याण निधी, मुख्यमंत्री आरोग्य योजना या सामान्य पत्रकारांच्या कामी आली नाही, राज्यात आजही ९० हून अधिक जेष्ठ पत्रकार हालाखीत जीवन जगत आहे, त्यांना पत्रकार पेन्शन मिळत नाही हे दुर्दैवच की, यावेळी ग्रामीण पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांवर ठरावं करण्यात आले, ते मांडले, त्यावर सर्वांनी हात वर करून मान्यता दिली व हें ठरावं निवेदन करून राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना दिले जाणार आहे असे ठरविण्यात आले.
या प्रसंगी आमदार राजेश बकाने यांनी पत्रकारांच्या संमेलनबद्दल मला आनंद होतोय, आपल्या वर्धा नगरीत प्रशस्त पत्रकार भवनासाठी ५० लाख मदत निधी देणारं असा शब्द दिला. तर आमदार सुमित वानखेडे यांनी ग्रामीण पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नावर त्यांना निवास व्यवस्था व्हावी यासाठी विधीमंडळात मी मुद्दे मांडेल त्यासाठी झटेल असे सांगितले, माजी खासदार रामदास तडस यांनी ही पत्रकार भवन व्हावे यासाठी आम्ही ही प्रयत्नशील आहोत.यावेळी दैनिक सकाळ (नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक) प्रमोद काळंबांडे यांनी ही ग्रामीण पत्रकारांच्या कष्टाची मला जाणीव आहे, त्यांच्या मेहनतीने अधिक चांगले विषय माध्यमात येतात, त्यांच्या अंडीअडचणी त्यासंदर्भातील मागणी रस्ता आहे त्याकामी मी नेहमीच त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.तर दैनिक लोकमतचे (नागपूर)उपसंपादक नरेश डोंगरे यांनी ग्रामीण पत्रकारितेच्या बळावर अनेक जण मोठे होतात त्यांना मात्र निराधार व्हावं लागत आहे,ग्रामीण पत्रकारांच्या न्यायासाठी आंदोलनात मी स्वतः सहभागी राहील असे त्यांनी सांगितले.
तर जेष्ठ पत्रकार प्रा राजू गोरडे यांनी ही ग्रामीण पत्रकार हक्कासाठी आता दुसरे स्वातंत्र्य युद्ध करावं लागेल या लढ्यात मी कायम पत्रकार संरक्षण समितीसोबत आहे असे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात सांगितले की “केसरीकार लोकमान्य टिळक यांच्या विचाराने पेटून उठण्याची आज गरज आहे, त्याशिवाय ग्रामीण भागात रक्ताचं पाणी करून कामं करणाऱ्या पत्रकारांचे आवाज या बहिऱ्या आंधळ्या सरकारला समजणार नाही”त्यासाठी आपण लढू असे सांगितले. या प्रसंगी वर्धा येथील दैनिक सकाळ चे पत्रकार जिल्हा प्रतिनिधी रुपेश खैरी यांचा सन्मान चिन्ह देऊन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला,
राज्यस्थरीय पत्रकार संमेलनाचे प्रास्ताविक विदर्भ अध्यक्ष रवि घुमे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले तर राष्ट्रीय कीर्तनकार गजानन भोरे यांनी सर्वांचे आभार मानले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष शशांक चतारे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप रघाटाटे, जिल्हा उपाध्यक्ष जितू गोरडे, जिल्हासचिव योगेश कांबळे, संजीव वाघ, राजेश सोळंकी, सतीश काळे, प्रशांत आजनकर, इकबाल शेख, अमोल सोटे, प्रमोद भोजने, राहुल मून, विनोद महाजन, प्रविण करोले, संतोष देशमुख, प्रशांत अवचट, शिवाजी चंदिवाले, गजानन जिकार, जगदीश कुर्डा, बाळू मुंगले, प्रा.प्रदिप झुटी, दिलीप चव्हाण, प्रमोद बोरकर, रवि साखरे ओमप्रकाश ढवळे, आनंद छाजेड व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधवांनी केले आहे. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
