अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रथमच मुंबई मध्ये आगळीवेगळी पण महत्वाची व्यवस्थापन कार्यशाळा
नाटक, मालिका, चित्रपट, इव्हेंट्स व्यवस्थापन कार्यशाळा
रविवार १७ ऑगस्ट, रोजी एकदिवसीय.
मुंबई प्रतिनिधी लव क्षीरसागर
यशवंत नाट्य मंदिर संकुल (C हॉल),
जे. के. सावंत रोड, माटुंगा
येथे यशस्वी रित्या संपन्न झाली
नाटक, चित्रपट, मालिका, इव्हेंट्समध्ये काम करणाऱ्यांसाठी – कोणत्याही क्षेत्रात व्यवस्थापन महत्वाचं…
त्यासाठी अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो.
PIN to CARPET ही संज्ञा नेमकेपणाने वापरतात, त्यासाठी आज ही क्षेत्र वेगाने वाढत आहेत .
केवळ मोठमोठे इव्हेंट्स किंवा मालिका, चित्रपट, नाटकच नाही, तर वाढदिवस, लग्नसमारंभ, बारसे, मुंज, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार सोहळे, कार्पोरेट इव्हेंटस, अशा अनेक छोट्या छोट्या कार्यक्रमांसाठी आज इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज नेमल्या जातात.
अनेक नवीन मुलं आज या क्षेत्रात येत आहेत. त्यांना नेमक्या मार्गदर्शनाची गरज असते. याचाच विचार करून आम्ही या आगळ्यावेगळ्या पण महत्वाच्या व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. असे व्हिजन चें सर्वेसर्वा श्रीनिवास नार्वेकर म्हणाले.
सोबतच पॅसिफिक ओसीयन प्रोडूकशन चें प्रसाद सावर्डेकर हे स्वतः मालिका व्यवस्थापक असून त्यांना ज्या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्यामुळे त्यांना ‘ व्यवस्थापन कार्यशाळा’ करणं खूप महत्वाचं व गरजेचं वाटलं होतं. म्हणून त्यांनी या एकदिवसीय कार्यशाळेचे श्रीनिवास नार्वेकर आणि टीम सोबत आयोजन केले होते.
या क्षेत्रात अनेक वर्ष यशस्वीपणे काम करत असलेले नामवंत जाऊ बाई जोरात वाडा चिरेबंदी श्यामची मम्मी असे दर्जेदार नाटकाचे जेष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव सर
स्वाभिमान ‘ स्टार प्रवाह काव्यांजली’ कलर्स मराठी वाहिनी, मालिका कार्यकारी निर्माते श्री. विवेक वैद्य.
विविध नाट्य, एकांकिका स्पर्धा, शासनाचे महत्वाचे पुरस्कार सोहळे, याचे व्यवस्थापक, समन्व्यक श्री. राकेश तळगांवकर.
रिजोंइस इंटरटेनमेंट व इव्हेंट टेक सोलुशन्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट चें संचालक, भारतभर इव्हेंट करणारे श्री.वैभव बाबाजी.
अशा दिग्गजानी त्यांचा अनुभव व बऱ्याच मोलाच्या गोष्टीचें मार्गदर्शन केले.
या व्यवस्थापन कार्यशाळेत सुरुवातीला उदघाटन करतेवेळी ‘ ऑल दी बेस्ट’ नाटकाचे लेखक, दिग्दर्शक श्री. देवेंद्र पेम सर यांनी कार्यशाळेत विद्यार्थी म्हणून सहभाग नोंदविला.
संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमात अभिनेते विजय गोखले, अभिनेते अनिल गवस यांनी ही भेट दिल्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थी यांना त्यांचेकडूनही मार्गदर्शन मिळाले.
नाटक, मालिका, चित्रपट, इव्हेंट्स व्यवस्थापन
विषयावर एकदिवसीय व्यवस्थापन कार्यशाळेत सहभागी सर्व प्रशिक्षणार्थीनां समारोप आणि प्रमाणपत्र वितरणाला प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, आणि अभिनेते श्री. अजित भुरे सर स्वतः हजर होते. त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला.
मार्गदर्शन करतांना आपल्याकडे ” कार्यकर्ता वाढले पाहिजेत आणि त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले पाहिजे. त्या करिता ‘ व्यवस्थापन’ कार्यशाळा’ करणं खूप महत्वाचे आहे असे बोलून, सर्वांचे कौतुक केले.
आगळ्या वेगळ्या एकदिवसीय व्यवस्थापन कार्यशाळेचें उत्तम संयोजन, मुख्य आयोजक श्रीनिवास नार्वेकर, प्रसाद सावर्डेकर आणि त्यांचे सहकारी तेजस्विनी जोईल, अनिश म्हेसळकर, आणि लव क्षीरसागर यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.
संपूर्ण एकदिवसीय कार्यशाळेतील सर्वच प्रशिक्षणर्थी अतिशय आनंदित झाले आणि शेवटी सर्वांनी खूप महत्वाच्या व्यवस्थापन कार्यशाळेचा दिग्गज व्यक्तीकडून लाभ मिळाला त्याबद्दल धन्यवाद व आभार मानले.
कार्यशाळेतील काहींनी त्यांचा अभिप्राय दिला. तो खालील प्रमाणे.
१) कालचा वर्कशॉप अतिशय चांगला झाला . अपेक्षापेक्षा जास्तच . मान्यवरांनीही अतिशय खुल्या मनाने मार्गदर्शन केले . निर्मितीच्या क्षेत्रात आम्हां नवख्यांना उभे रहाण्यासाठी अधिक खोलवर मार्गदर्शन अपेक्षित आहे त्यानुसार काही आखणी व्हावी .
ग्रुपवरच्या सर्व सदस्यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!
ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या कल्पना वा अडचणी मांडत जाऊ आणि एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करूया .
जो जे वांछील तो ते लाहो…
प्रशिक्षणार्थी निलेश पाळेकर यांनी अभिप्राय दिला.
२) खुपचं छान झाला कालचा कार्यक्रम, प्रत्येक वक्त्यांनी अतिशय सुंदर आणि समर्पक माहिती दिली.
श्री.नार्वेकर सर ,
श्री.व सौ.सावर्डेकर , श्री.लव आणि टिम आपले आयोजन अत्युत्तमच
प्रशिक्षणार्थी राजेश मौर्य यांनी अभिप्राय दिला.
३)व्हिजन आणि पॅसिफिक प्रोडक्शन तर्फे नाटक- मालिका-चित्रपट-इवेंट्स या क्षेत्रातील व्यवस्थापन या महत्वाच्या विषयावर आपण कार्यशाळा आयोजित केली याबद्दल प्रसाद सावर्डेकर सर आणि श्रीनिवास नार्वेकर सर आपल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि आभार!
खरंतर अशा प्रकारचा एखादा वर्कशॉप होईल या शोधात मी होतो आणि तो शोध काल संपला असं यानिमित्ताने सांगावेसे वाटते. विषयाप्रमाणेच कार्यशाळेचे योग्य आयोजन आणि नियोजन आणि वेळेत कार्यक्रमाला सुरवात आणि सांगता करण्यात आली, हे सुद्धा यातून शिकण्यासारखेच होते.असो. विविध क्षेत्रातील दिग्गज बोलावून दिवसभर असे ज्ञान कोण देतं, पण आपण ते देऊन आपलंस केलंत. सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन माहितीपूर्ण तसेच महत्त्वपूर्णही होते. अशा प्रकारच्या कार्यशाळांची आज आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा आभार!! आणि तुमच्या पुढील उपक्रम वाटचालीत मलाही सहभागी होण्यास निश्चितच आवडेल.
प्रशिक्षणार्थी सचिन चव्हाण यांनीअभिप्राय दिला.
