अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
- पुणे प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी-
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर
विधिसंघर्षीत बालकाकडुन ०३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन ०१ दुचाकी व ०२ ऑटो रिक्षा केल्या जप्त
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस स्टेशन कडील गु.र.नं.३१२/२०२५, भा.न्या.सं.क. ३०३ (२) या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व चोरीस गेले ऑटो रिक्षाचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनंजय ताजणे व साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराव्दारे बातमी मिळाली की, म्हाडा कॉलनी २ नंबर पार्किंगच्या समोरील पत्र्याच्या आडबाजुरा, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे येथे असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ चोरलेल्या ऑटो रिक्षासह एक मुलगा उगा आहे. तसेच सदरची ऑटो रिक्षा ही चोरीची असलेबाबतची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन सदर नमुद मुलाला ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा मुलगा विधिसंघर्षीत बालक असल्याचे समजले. सदर विधिसंघर्षीत बालकाच्या ताब्यात मिळुन आलेल्या ऑटो रिक्षाचे आर.टी.ओ. नंबरवरुन माहिती काढली व गुन्हे अभिलेखावरील अभिलेख पाहता सदर ऑटो रिक्षाबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु. र.नं.३१२/२०२५, भा.न्या.सं.क.३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद असलेबाबत माहिती मिळाली. नमुद विधिसंघर्षीत बालकाकडे चौकशी करता त्याने ०१ दुचाकी गाडी व ०२ ऑटो रिक्षा असे चोरी केल्याचे सांगितल्याने नमुद विधिसंघर्षीत बालकाकडुन एकूण ०३ वाहने जप्त करुन १) सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. ३१२/२०२५ भा.न्या.सं.क.३०३ (२) २) हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. ७४९/२०२५, भा.न्या.सं.क.३०३ (२) ३) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. ३५०/२०२५, मा.न्या.सं.क.३०३ (२) असे वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन सदर विधिसंघर्षीत बालकाकडून १,७५,०००/-रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, शाखा श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा २. पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, चे दुय्यम प्रभारी अधिकारी राहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, महिला सहा. पोलीस निरीक्षक वर्षा कावडे, पोलीस अंमलदार धनंजय ताजणे, साईकुमार कारके, गणेश ढगे, दत्तात्रय पवार, अजित शिंदे, नारायण बनकर, प्रदीप राठोड, निनाद माने, बाळु गायकवाड, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, अमित गद्रे, शिवाजी सातपुते, यांनी केली आहे.
