अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कृषिमंत्र्याची मुंबई मंत्रालयात हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात भेट घेऊन आमदार राजू भैया नवघरे यांनी माहिती दिली
हिंगोली प्रतिनिधी. श्रीहरी अंभोरे पाटील
वसमत :ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीला विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात सुरूवात केली जिल्हाभरामध्ये मोठा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
एकंदरीतच शेतातील लागवड करण्यात आलेल्या कापूस तूर मूग उडीद सोयाबीन हळद ऊस केळी आदि इतर पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचे दिसून आले आहे तर अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याने शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर नदी नाल्याकाटच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतातील लागवड केलेले पीकही अनेक ठिकाणी वाहून गेल्याचे घटना घडल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे तर अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर रहदारीच्या भागातील मोठ्या रस्त्याला जोडणारे ग्रामीण भागातील रस्ते वाहून गेले तर काही ठिकाणी तुटून रहदारीला मोठा आडथळा निर्माण झाला आहे त्याच बरोबर अनेक ठिकाणी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या फुलांच्या दरडा कोसळणे असाही प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाभरामध्ये झाला आहे. यासंदर्भात वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांची मुंबई येथे भेट घेऊन हिंगोली जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टी व नुकसान झालेल्या पिकासंदर्भात चर्चा करून हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदनही देण्यात आले आहे.
