अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ओम नमः शिवाय ज्योतिर्लिंगांपैकी एक सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाऊन मनोभावे दर्शन घेतले
प्रतिनिधी मुकूंद मोरे
गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब दरवर्षी श्रावणाच्या चौथ्या सोमवारी ‘श्री क्षेत्र भीमाशंकर’ येथे जाऊन दर्शन घेत असत आणि ४५ वर्षांपूर्वी त्यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे.
श्रावण महिन्यातील आजच्या पवित्र सोमवारी, महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भगवान शंकराचे मनोभावे दर्शन घेतले. शंकराच्या पिंडीवर दुधाचा, पाण्याचा आणि बेलपत्रांचा अभिषेक करताना मन पूर्णपणे देवाच्या चरणी लीन झाले. त्यावेळी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक समाधान जाणवले. हे केवळ दर्शन नव्हते, तर भक्ती आणि शांतीचा एक अलौकिक अनुभव होता. शिवसेना नेते राजन विचारे शिवसेना प्रवक्ते अनिश गाढवे व शिवसैनिक उपस्थित होते
हर हर महादेव
