अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
हिंगोली जिल्हात पारोळा येथे पाण्यात बुडवून एका तरुणाचा मुत्यु
हिंगोली . श्री श्रीहारी अंभोरे पाटील
जिल्ह्यातील हिंगोली पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीतील जवळच असलेल्या पारोळा येथील पाण्यात धबधबा पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मेथा गावचा रहिवासी गोविंद गंगाधरराव लोंढे असे मृत तरुणाचे नाव आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील आठवडा भरा पासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले व तलाव एकत्रितओसंडून वाहत असून, अनेक ठिकाणी पाण्याची पातळी मोठी धोकादायक बनली आहे याच पार्श्वभूमीवर रविवारी दि. १८ ऑगस्ट रोजी गोविंद लोंढे हा मित्रांसोबत हिंगोली लगत जवळच असलेल्या पारोळा धबधब्याजवळ गेले असताना ते पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि तीव्र प्रवाहात अडकून त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
सदरील घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पारोळा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. या ठिकाणी सध्या ग्रामीण पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
ठाणेदार श्यामकुमार डोंगरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्याच्या दिवसात खोल पाण्यात जाणे टाळावे. प्रवाहाचा अंदाज न लागल्यामुळे अशा ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता असते. पर्यटकांनी अधिक आकर्षणासाठी जीव धोक्यात घालू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
