अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास मानवतला मोठा प्रतिसाद
मानवत / प्रतिनिधी.
—————————
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षा निमित्त येथील तीर्थ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यास मानवत पंचकोशितील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मानवत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ स्मारकापासून मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याची सांगता संत श्रेष्ठ सावता माळी मंदिरात करण्यात आली. याठिकाणी हभप महामंडलेश्वर स्वामी मनिषानंदजी पुरी यांनी प्रवचन केले.
पालखी सोहळ्यास स्वामी रसानंदजी पुरी महाराज, स्वामी
शिवेंद्रचैतन्यजी , राघव चैतन्य, विश्रृत चैतन्य, भारतीताई चैतन्य हभप गणेश महाराज कदम, हभप पंकज महाराज थोरे, हभप अब्दल महाराज, हभप माऊली महाराज खडकवाडीकर, हभप बाजीराव सावंत, हभप बालासाहेब रोडे यांच्या सह मानवत, रत्नापूर,सावळी, सावरगाव इ.ठिकाणाहून अनेक संतजन आणि शहरातील माता-भगिनीसह भाविक यावेळी उत्साहाने सहभागी झाले होते.
पालखी उदघाटन सोहळ्यास युवानेते डॉ अंकुशरावजी लाड, सभापती पंकज आंबेगावकर, संजय लड्डा, ज्ञानेश्वर मोरे, प्रसाद जोशी, अनंत गोलाईत, बालाजी वासुदेवराव पोकळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश गुरुकुलचे हभप पंडित महाराज डाके, रेणकोजी दादा दहे, श्यामभाऊ कोक्कर व मानवत शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष व पदाधिकारी व सदस्य यांनी अथक परिश्रम घेऊन प्रयत्न केले.
