अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बालकाच्या आरोग्यासाठी आईचे दूध अनमोल डॉ. आशेक शेख वैद्यकिय अधिक्षक
मानवत / प्रतिनिधी
—————————
जागतिक स्तनपान सप्ताहाच्या औचित्याने मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी विशेष स्तनपान जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशेक शेख यांनी केले.
डॉ. आशेक शेख यांनी मार्गदर्शनात सांगितले की, “आईचे दूध हे बालकासाठी सर्वोत्कृष्ट व संपूर्ण आहार असून त्यात जीवनासाठी आवश्यक सर्व पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ आईचे दूध देणे हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
यावेळी त्यांनी स्तनपानामुळे बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासाबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हे अधोरेखित केले. तसेच मातेला होणारे आरोग्य फायदे, योग्य स्तनपान तंत्र, व समाजातील चुकीच्या समजुती दूर करण्याबाबतही सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी शेख आदिल , डॉ कलीम खान , आधिपरिचारिका शुभांगी जोशी बालिका सुरवसे रत्नमाला दाभाडे , रेणुका गिराम , करून ढेपे , आरोग्य कर्मचारी अकबर पठाण , राजू चिंदाले, बजरंग ढवळे, राजू पिंपळे आणि अनेक माता उपस्थित होत्या. शेवटी उपस्थित मातांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग्य पद्धतीने व नियमितपणे स्तनपान करण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि वातावरणात मातृत्वाचा स्नेह व आरोग्याची जाणीव अधिक दृढ झाली.
