अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रभक्तीच्या स्वरांनी गुंजले
अनिल राठोड़ जलगांव
पालकमंत्र्यांच्या देशभक्तीपर गीताच्या सुरांनी सभागृह झाले मंत्रमुग्ध
जळगाव दि. 14 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून गेला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिवर्तनच्या वतीने आयोजित संगीतमय सादरीकरणात राष्ट्रप्रेमाचा अनोखा आविष्कार रंगला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः मंचावर उभे राहून “हर करम अपना करेंगे, दिल दिया है, जान भी देंगे” हे गीत सादर करताच संपूर्ण सभागृह देशप्रेमाच्या लहरींनी भारून गेले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त टाळ्यांनी सभागृहा दुमदुमून गेले.
परिवर्तनचे शंभू पाटील यांच्या ओघवत्या आणि स्फूर्तीदायक निवेदनाने कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली. राष्ट्रभक्तीपर गीतांच्या लहरींमध्ये प्रत्येक उपस्थित मनाने पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास अनुभवला.
कार्यक्रमाला आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोकभाऊ जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हाती तिरंगा झेंडा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तिरंगा उंचाऊन तिरंग्याला अभिवादन केले , स्वातंत्र्याचा अभिमान जपत, संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर देशभक्तीच्या स्वरांनी आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने उजळून निघाला
