अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
श्री आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित निष्ठेची दहीहंडी २०२५ कार्यक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! श्री आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित निष्ठेची हंडी महा दहीहंडी 2025 कार्यक्रम सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी अनेक कलाकारांनी कलाकृतींचे सादरीकरण केले तसेच १०८ हून अधिक दहीहंडी पथकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावर्षीच्या श्री आनंद चॅरिटेबल ट्रस्ट निष्ठेच्या महा दहीहंडी कार्यक्रमात हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीप्रीत्यर्थ १ लाख ११ हजार १११ मानाची हंडी फोडून अखिल मालपा गोविंदा पथक, डोंगरी मुंबई विजेते ठरले. ठाण्यासाठी गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे सृतिप्रीत्यर्थ १ लाख ११ हजार १११ मानाची हंडी ठाण्यातील गौरीशंकर सिध्दीविनायक ठाणे, ओम साई गोविंदा पथक ठाणे, सायबा गोविंदा पथक ठाणे, सिंग नगर राजा गोविंदा पथक ठाणे यांना मिळाला. महिलांसाठी माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृतीप्रीत्यर्थ ५१ हजारांची हंडी शिवतेज महिला क्रिडा मंडळ यांना मिळाला.
या कार्यक्रमाला आमदार श्री. सुनील शिंदे, शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव श्री. आदेश बांदेकर, उपनेते श्री. गुरूनाथ खोत, संपर्कप्रमुख श्री. नरेश मनेरा, दिवा संपर्कप्रमुख श्री. रोहिदास मुंडे, जिल्हाप्रमुख श्री. केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, नीलम धवन, कळवा मुंब्रा विधानसभा संघटिका पुष्पलता भानुषाली, कळवा समन्वयक माजी नगरसेविका नीलिमा ताई शिंदे, ठाणे उपजिल्हाप्रमुख श्री. कृष्णकांत कोळी, श्री. सुनिल पाटील, कल्याण उपजिल्हाप्रमुख श्री.विजय देसाई, समन्वयक श्री. संजय तरे, ठाणे शहर प्रमुख श्री. प्रदीप शिंदे, दिवा शहर प्रमुख श्री. सचिन पाटील, मुंब्रा शहर प्रमुख श्री. विजय कदम, ठाणे उपशहरप्रमुख श्री. सचिन चव्हाण, श्री. वसंत गव्हाळे, परिवहन सदस्य श्री. राजेंद्र महाडिक , विधानसभा संघटक श्री. चंद्रकात विधाते, श्री. संजय ब्रीद, प्रमिलाताई भांगे, माझी अर्धांगिनी सौ.नंदिनी विचारे, मा.नगरसेवक श्री.मंदार विचारे तसेच सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
