अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जुनी डोंबिवली रेल्वे अंडरपास कामाचा धीम्या गतीने चालणारा वेग व मोठागाव मधील रेल्वेच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर पडणारे खड्डे
प्रतिनिधी मुकूंद मोरे
जुनी डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे रेल्वे लाईन लागत असलेल्या चाळींमध्ये पाणी शिरत होते व नागरिकांकडून अंडरपास मधील खड्डेमय रस्त्याच्या तक्रारी मला मिळाल्या होत्या.
जुनी डोंबिवलीतील नव्या अंडरपासचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था नाही, रस्ते अपूर्ण अवस्थेत, नाले उघडे पडले आहेत.
यासोबतच मोठागाव चौक ते मानकोली ब्रिज या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रेल्वेचे हजारो टन साहित्य नेणाऱ्या जड वाहनांमुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.
गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला आहे. दरवर्षी हजारो भाविक गणेश घाटावर बाप्पाच्या मूर्ती विसर्जनासाठी याच मार्गांचा वापर करतात. अपूर्ण काम व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या व बाप्पांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे.
आज DFCCL मधील टाटा प्रोजेक्ट्स चे Chief Project Manager श्री. आर. के. शर्मा जी, क.डो.म.पा. ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी श्री राजेश सावंत जी , Section A Manager श्री. रंजीत जी, क.डो.म.पा. ‘ह’ प्रभाग क्षेत्राचे उपअभियंता श्री. अजय महाजन जी यांच्यासह जागेवर पाहणी केली. DFCCL व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पावसाळी पाण्याचा निचरा व रस्ता पूर्ण करण्याचे काम गणपती बाप्पाच्या आगमना आधी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या व मोठागाव मधील रोड डांबरीकरण करून द्यावे ही विनंती केली.
दोन्ही विभागांनी तातडीने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून, काम पुर्ण न झाल्यास रेल्वेच्या DFCCL प्रोजेक्टचे डोंबिवलीतील संपूर्ण काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) डोंबिवली उपशहरप्रमुख श्याम चौघुले तसेच जुनी डोंबिवलीतील ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेच्या सोयीसाठी आम्ही सतत रस्त्यावर, आणि प्रशासनाच्या मागे आहोत
