अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सेवा हीच मणूष्याचे श्रेष्ठ कर्म आहे.डॉ. रामेश्वर नाईक
मानवत / वार्ताहर.
मानवत येथे दि.१६ आगस्ट रोजी मनूष्य सेवा म्हणजे निस्वार्थ प्रेमाची कृती असून मणूष्य सेवा हेच श्रेष्ठ कर्म आहे. त्या कर्मातून केवळ समाजाचा नाही तर आत्म्यांचा उद्धार होतो असे प्रतिपादन प्रसिध्द वैद्यकीय व्यावसायीक डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी शहरातील जुने दत्त मंदिर येथे धर्मार्थ दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
शहरातील जुने दत्त मंदिर येथील संचालित धर्मार्थ दवाखानाचे उद्घाटन गूंज संस्थानचे मुख्य विश्वस्त श्री प.पू.श्रीराजेशभाई देसाई, व डॉ. रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी डॉ. शशांक खेकाळे डॉ .आनंद कत्रुवार ,डॉ. विजय कहेकर, डॉ . सचिन चिद्रवार,डॉ. सौरभ ढमढरे, मानवत केमिस्ट संघटना अध्यक्ष संजय नाईक, संजय लड्डा ,डॉ वरूण सोमाणी, डॉ. योगेश तोडकरी,वैभव पोकळे डॉ.संजय मुंदडा, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. रामेश्वर नाईक म्हणाले की मनूष्य कर्म सिद्धांता नुसार चांगले फळ प्राप्त होते भगवद्गीतेत सांगितल्या प्रमाणे “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन” म्हणजे चांगले कर्म केल्यावर नक्कीच चांगले परिणाम मिळतात. असे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड अनिरुद्ध पांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रसाद जोशी यांनी केले. यावेळी शहरातील समाज बांधव नागरिक , व्यापारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
