अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व झेप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छ. संभाजीनगर शहरातील एडसग्रस्त आश्रमातील मुलाना अन्नदान व फळ वाटप..
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
छ. संभाजी नगर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व झेप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एड्सग्रस्त मुलांच्या आश्रमात फळ आणि अन्नदानाचा कार्यक्रम तथागत ग्रुपचे छ. संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छ. संभाजीनगर शहरातील विविध भागातील फुटपाथ वरील गरजू भटके विमुक्ताना फळे व फराळ आणि अन्न दान करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला महिला आघाडी तथागत ग्रुपच्या राष्ट्रीय सचिव आमच्या मार्गदर्शक ललिता ताई मगरे,तथागत ग्रुप पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा मनीषा सोनवणे तर तथागत ग्रुप संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश हिवाळे, अनुराधा दिव्यांग सेवा मंडळाच्या सर्वेसर्वा अध्यक्षा तथा झेप फाउंडेशनच्या जिल्हा सचिव अनुराधा सोनपसारे, अनुराधा दिव्यांग सेवा मंडळाचे सचिव तथा झेप फाउंडेशनचे शहर सचिव मिलिंद सोनपसारे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (कायदे विभाग) ऍडव्हेकेट देवकांत मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ( कामगार विभाग) संतोष खरात, तथागत ग्रुपचे शहर सचिव अमोल भाऊ साळवे व अनेक मान्यवर, तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते
