अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
श्वासत शेतीचे पुस्तक व सेंद्रिय हळदीचे पाकीट देऊन कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांचे नांदेड मध्ये स्वागत
प्रतिनिधी. हिंगोली. श्रीहरी अंभोरे पाटील
कृषिमंत्री मा.दत्तात्रय भरणे मामा यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन देताना कृषीभूषण :-भगवानभाई इंगोले, जिल्हाअध्यक्ष किसान ब्रिगेड नांदेड* .* शेतकऱ्यांचा खर्च कमी करुन शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ कशी होईल यासाठी शेतकऱ्यां विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. पीक विमा नुकसान भरपाईत ,अतिवृष्टी, पूरस्थिती ,दुष्काळग्रस्त परिस्थिती, यामध्ये पण पिकविमा लागू करावा , पिकांचे प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी फॉरेस्ट वनविभागाला सांगून वानर, डुक्कर, यांना पिंजऱ्यात पकडून जंगलामध्ये सोडणे, पशु, डुक्कर ,वानरा मुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई वाढवुन देणे, तार कुंपणासाठी अनुदान देने , जैविक कुंपणासाठी फळबाग योजनेमध्ये करवंद पिकांचा समावेश करणे, रासायनिक खतांच्या अति विषारी औषधांच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होत आहे निसर्ग पर्यावरणाचे, शेतकऱ्यांचे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येत आहे आरोग्याच्या समस्या दिवसें दिवस वाढत आहे कॅन्सर, शुगर ,बीपी धब्लड प्रेशर,मोटपा सारखे असाध्य आजार वाढत आहेत यासाठी नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक सेंद्रिय शेतीमधील कामे मनरेगा अंतर्गत करणे, बरू, ढेंच्या हिरवळीचे खत , रॉक फॉस्फेट, भूसुधारक जिप्सम हे अनुदान स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे यावरचा जीएसटी कमी करणे हिरवळीच्या खताचे बरु, डेंच्या यांचे बिजउत्पादन करण्यासाठी शेतकरी गटांना अनुदान देने , देशी गौवंश वाढण्यासाठी मध्यप्रदेश छत्तीसगड गुजरात राज्य प्रमाणे देशी गाय सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे , मागच्या २०२३/ २०२४/वर्षी पारदर्शीपणे लकी ड्रॉ पद्धतीने परदेश दौऱ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी रद्द न करता त्यांना यावर्षी निवड झालेल्या शेतकऱ्यांसोबत परदेश दौऱ्यासाठी पाठवणे इत्यादी मागण्याचे निवेदन दिले. शाश्वत योगिक शेती बदल माहीत दीली, शेतकऱ्यांना बाजार भावांची, उत्पादनांची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी तणावग्रस्त जीवन जगत आहे मजबूरन व्यसनाच्या आहारी जात आहे , शेतकऱ्यांनी सकारात्मक जीवनशैली अवलंबून पशु पक्षी प्रकृती पर्यावरण यांचे संरक्षण करून प्रकृती पती परमात्म्याच्या आठवणी मध्ये राहून योगीक शेती केली तर शेतकऱ्यांचे मनोबल वाढते पाच तत्वांचे प्रकृतींचे शेतकऱ्यांना सहकार्य मिळते संघटन वाढवण्यासाठी मूल्यांची धारणा होते यासाठी शेतकऱ्यांनी शाश्वत योगिक शेतीचे प्रशिक्षण घेऊन शाश्वत योगिक शेतीचा अवलंब करावा
शाश्वत योगिक शेतीचे पुस्तक, सेंद्रिय हळद भेट देऊन त्यांचे नांदेड नगरीमध्ये स्वागत केले.
