अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सावन कुमार यांनी भंडारा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला नेहमीच प्रयत्नशील राहणार तर जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांची मुंबईला बदली..!!
अनुजा कारखेले-देवरे भंडारा जिल्हा प्रतिनिधी
राज्य सरकारकडून मंगळवारी रात्री उशिरा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते आता काम पाहणार आहेत. डॉ. संजय कोलते यांनी भंडारा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून भंडारा जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले, तर त्यांच्या जागेवर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले सावन कुमार (भा.प्रे.से ) यांनी भंडारा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. नूतन जिल्हाधिकारी सावन कुमार हे (2019) च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. मागील काही महिन्यांपासून राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचे चांगलेच पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून प्रशासनात चांगलाच बदल पाहायला मिळाला आहे. यामध्ये आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा चांगलाच धडाका लावला आहे. यामध्ये मंगळवारी राज्य सरकारने सात वरिष्ठ ( आयएएस ) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला असून यामध्ये भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांचाही समावेश आहे. त्यांची बदली शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर नंदुरबारचे सीईओ सावन कुमार यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून. भंडारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झालेले नवनियुक्त जिल्हाधिकारी सावन कुमार लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका पाहायला मिळत आहे. अचानक बदल्यांमुळे प्रशासकीय विभागात देखील खळबळ उडाली आहे.
