राजे छत्रपती कला महाविद्यालय येथे ग्रंथपाल दिनाचे आयोजन
प्रतिनिधी -सारंग महाजन
स्थानिक धामणगाव बढे राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बढे येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन यांचे जयंती निमित्त दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोज मंगळवार ला ग्रंथपाल दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर स्वप्नील दांदडे यांनी आयोजित केलेल्या ग्रंथपाल दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मेश्राम हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. शशिकांत सीरसाट, आयक्यूएसी कोऑर्डिनेटर डॉ. महादेव रिठे व डॉ. शाहेदा नसरीन उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर मान्यवरांचे ग्रंथालय वाचकांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकेतून डॉ. दांदडे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवनावर सखोल प्रकाश टाकून ग्रंथालय शास्त्रा मध्ये त्यांचे योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ अविनाश मेश्राम यांनी ग्रंथाची साथ धरणारा भूतलावर महती गाजवू शकतो असे मत व्यक्त करतानाच ग्रंथांना किती महत्त्व आहे याचे उदाहरण देताना पसायदानाचे उदाहरण देऊन ग्रंथ हेच गुरु आहेत याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु ………… तस्मै श्री गुरुवे नमः ही उक्ती ग्रंथांसाठी वापरली व विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद जोपासण्याचे आवाहन केले. डॉ. रिठे यांनी मोबाईल व ग्रंथ यामधील तफावत विद्यार्थ्यांना समजावून दिली तर प्रा. सिरसाट व डॉ नसरीन यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून वाचनाचे महत्त्व व ग्रंथालय संगतीचे परिणाम समजावून सांगितले.
प्रसंगी नव्याने प्रवेशित बीए प्रथम च्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाशी ओळख करून देण्यात आली व ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांची माहिती करून देण्यात आली.
सदर कार्यक्रमाला डॉ. भगवान गरुडे, डॉ. विजय मोरे, डॉ. गजानन वानखडे, डॉ. कामिनी मामर्डे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. संचलन डॉ कामिनी मामर्डे यांनी तरआभार श्री संदीप तोटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कु सरिता बढे कु मोनिका गणगे, कु.आरती बोरसे कु. मानवी कोठाळे, दिव्या लवकर, मुक्ता मोरे, वैभव बोरसे आदित्य चव्हाण आदेश वाघ व शेख राहील यांनी परिश्रम घेतले.
