कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची धडक कारवाई !
मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या…
358 लाखांचे 46 मोबाईल हस्तगत..!!
आरती पाटील कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर शहरांत बस स्थानक तसेच रेल्वे स्टेशन या परिसरांत मोबाईल चोरांचे प्रमाण चांगलेच वाढले असून. त्या अनुषंगाने कोल्हापूर पोलीस प्रशासन देखील अशा चोरांवर करडी नजर ठेवून आहे. आदरणीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशावरून कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर डॉ. सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील शिताफीने तपास करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये आरोपी नामे. गणेश अनिल माने (वय 23 ) रा. नागोबावाडी पेठ वडगांव ) महादेव राजाराम पाटील (वय 34) रा. साजणी ता. हातकणंगले) आणि गणेश शिवाजी माने (वय 27 ) रा. कोळा पुजारी वस्ती गौडवाडी रोड सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल 46 मोबाईल हँडसेट मिळाल्या असून किंमत 358,500/रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार आणि अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस अंमलदार संदीप पाटील वसंत पिंगळे शिवानंद मठापती सचिन जाधव अनिकेत मोरे अमित सर्जे संजय पडवळ विलास किरोळकर संजय हुंबे सतीश सूर्यवंशी अरविंद पाटील आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.
