अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रा. लूटे सरांचा नागरी सत्कार संपन्न
भारज प्रतिनिधी राजेश दामधर
जालना जिल्हातील जाफ्राबाद तालुक्यातील भारज बु येथे 38 वर्षापासून श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चालू आहे या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नवले सर हे सेवानिवृत्त झाले आहे त्यामुळे या महाविद्यालयाचे नविन प्राचार्य म्हणून चारित्र संपन्न आणि कुशल वक्तीमत्व असलेले प्रा. श्री मनोहर जनार्धन लूटे सर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे . या निमित्ताने भारज खुर्द येथील गावकऱ्यांनी श्री लुटे सरांचा नागरी सत्कार केला आहे भारज खुर्द येथे आदिवाशी बांधवांची संख्या भरपूर असल्यामुळे जागतिक आदिवाशी दिनाचे औचित्य साधून हा दिवस येथे आनंदाने साजरा केला आहे . यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री शरद गव्हाणे यांनी केले तर प्रस्ताविक श्री रामेश्वर इंगळे यांनी केले यावेळी येथील प्रथम नागरिक सौं लिलाबाई गव्हाणे , ग्रामविकास अधिकारी श्री सदानंद इंगळे विष्णू कोलते , विष्णू तारू , गोपीनाथ गव्हाणे , भाऊराव तारू , शेषराव दांडगे , केशव मुरडकर , प्रकाश दांडगे , अंकुश गव्हाणे , मुकुंद गव्हाणे , भरत दांडगे , विष्णू हुस्के , गजानन गव्हाणे , लिंबाजी तारू , परसराम तारू , गजानन मोरे, समाधान गव्हाणे , आकाश जाधव, अक्षय इंगळे , सचिन तारू , श्रीराम दांडगे , सुधाकर दांडगे , विष्णू तारू , गोपीनाथ तारू , विलास तारू , केशव तारू ,सौ विमलबाई तारू , खंडू तारू , योगेश गव्हाणे , संदिप हुस्के , गजानन दांडगे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
