अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रत्नागिरीत पैशाच्या वादांतून वृद्ध महिलेचा खून… चिपळूण पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या… अवघ्या ४८ तासांत गुन्हा उघडकीस..!!
कलावती गवळी रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी
रत्नागिरी चिपळूण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन दिवसांपूर्वी चिपळूण शहरांलगत धामणवणे येथे पैशाच्या वादांतून वृद्ध शिक्षका महिलेचा खून झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. वर्षा जोशी (वय 68) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे याप्रकरणी पोलिसांनी कसून आणि शिताफीने तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या 48 तासांत पोलिसांनी जयेश भालचंद्र गोंधळेकर या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा खून पैशाच्या वादांतून झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि वृद्धाचा खून प्रकरणाचा अखेर उलगडा केला. पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले… दोन दिवसांपूर्वी वर्षा दोशी यांचा खून करताना त्यांचे हात पाय बांधून नंतर त्यांचेच कपडे त्यांच्या तोंडात कोंबून व नाकावर ठेवून त्यांना ठार मारण्यात आले होते. चोरीच्या उद्देशाने हा खून केला खुनानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त टाकले होते. घरांतील 27 हजार रुपयांची रोख, रक्कम दोन बांगड्या चैन सोन्याचा गंठण हे दागिने लांबवले शिवाय कोणतेही धागेद्वारे समोर येऊ नयेत म्हणून या मारेकरांनी सीसीटीव्ही पळवले, डीव्हीआर व कॅम्पुटरची हार्ड डिक्स हस्तगत केली आहे. तर दागिन्यांचा तपास सुरू आहे. या खून प्रकरणात अजून एक आरोपी असल्याचा पोलिसांनी संशय असून त्याच्या मागे पोलीस पथक पाठविण्यात आले आहे. जयेश गोंधळेकर हा काही वर्षांपूर्वी सातारा येथे नोकरी करीत होता. पण तो मूळचा वर्षा जोशी यांच्या गोंधळे गावातीलच गोंधळेकर कुटुंबातील आहे. सध्या तो चिपळूण परिसरांत राहत होता. मात्र कोणताही कामधंदा करीत नव्हता त्यामुळे पैशासाठीच त्याने हा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ( पोलीस कर्मचाऱ्यांना रोख बक्षीस जाहीर ) त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी खुनाचा तपास अवघ्या 48 तासांत लावल्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग,चिपळूण पोलीस ठाणे,डीपी स्कोर,व या तपास कार्यात सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांनी वैयक्तित दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले, आणि या प्रकरणी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे.
