अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अत्यंत वेदनादायी आणि हृदयद्रावक घटना
प्रतिनिधी मुकूंद मोरे
नाशिक येथील वडनेर दुमाला भागात एक अत्यंत वेदनादायी आण हृदयद्रावक घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आयुष आता या जगात नाही फक्त ३ वर्षांचं कोवळं वय घराबाहेर खेळत असताना बिबट्याच्या हल्ल्याने त्याचं आयुष्य हिरावलं.. आज त्याच्या अंत्ययात्रेच्या आधी त्याची ९ वर्षांची बहीण मात्र राखी बांधताना दिसली थंड पडलेल्या हातावर तिने हळुवारपणे राखी गुंफली. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी ती त्याला ओवाळत होती जणू सांगत होती तू कुठेही असलास तरी, माझा भाऊच राहशील राखीच्या धाग्यात प्रेम, ममता आणि आठवणी गुंफलेल्या आहेत. पण, यावेळी भावाकडून भेट नव्हती होती ती फक्त एक कायमच्या विरहाची नकोशी वेदना या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होते आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळही हरवू शकत नाही… पण इथे नियतीनं मात्र क्रूरपणे नातं तोडून टाकलं. आपली नाती जपा मित्रांनो… काळ कधी घाला घालेल सांगता येत नाही
चिमुकल्या आयुषला भावपूर्ण श्रद्धांजली.
