अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रक्षाबंधनाच्या दिवशी गडचिरोली महामार्ग ठप्प प्रवाशांचे हाल!
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मनोज उराडे
आष्टी–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासून तब्बल पाच तास वाहतूक ठप्प
आष्टीजवळील अनखोडा नाला परिसरात अवजड मालवाहू ट्रकचा मोठा अपघात टळला. ट्रक कठडा तोडून पुलाखाली कोसळण्याच्या क्षणीच थांबला, मात्र त्यातील जड सामान बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात येत आहे.
दरम्यान, या कामामुळे संपूर्ण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, रक्षाबंधनासारख्या सणासुदीच्या दिवशी* गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांना अडथळा, तासन्तास प्रतीक्षा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, नागरिकांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले आहे.
